अर्जुनसाठी मलायका झाली शेफ, त्याच्यासाठी खास मेजवानीचा बेत
सध्या ही जोडी गोव्यामध्ये, मलायकाची बहिण अमृता अरोरा हिच्या ह़ॉलिडे होमवर असल्याचं म्हटलं जात आहे. जिथं मलायका- अर्जुन काही खास क्षण अनुभवत आहेत. जिथं बी- टाऊनची ही सुपरफिट अभिनेत्री तिच्या प्रियकरासाठी एक शेफ झाली आहे.
मुंबई : अभिनेता (Arjun Kapoor) अर्जुन कपूर आणि अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्या नात्याची चर्चा होणं किंवा या जोडीनं माध्यमांचं लक्ष वेधणं ही आता नवी बाब नाही. किंबहुना आता खुद्द मलायका आणि अर्जुन यांनीच त्यांच्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं मोस्ट हॅपनिंग सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत आता त्यांचंही नाव येऊ लागलं आहे.
सध्या ही जोडी गोव्यामध्ये, मलायकाची बहिण अमृता अरोरा हिच्या ह़ॉलिडे होमवर असल्याचं म्हटलं जात आहे. प्रेमात असणाऱ्या जोड्या किंवा प्रियकर- प्रेयसी एकमेकांसाठी अनेक गोष्टी करतात. कधीकधी तर, साथीदाराच्या अगदी लहानशा कृतीनंही तो क्षण अधिकच खास होऊन जातो. सध्या मलायका- अर्जुनही असे खास क्षण अनुभवत आहेत. जिथं बी- टाऊनची ही सुपरफिट अभिनेत्री तिच्या प्रियकरासाठी एक शेफ झाली आहे.
अर्जुननं सोशल मीडियावर इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिनं बनवलेल्या काही पदार्थांचा एक लहानसा व्हिडिओ शेअर केला आहे. 'जेव्हा ती रविवारी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते.... ', असं कॅप्शन त्यानं या इन्स्टा स्टोरीला दिलं.
New Year 2021 | कोरोनामुळं अडलं शुभमंगल, यंदा विवाहबंधनात अडकणार 'या' सेलिब्रिटी जोड्या
मलायकानंही अर्जुननंच शेअर केलेली स्टोरी रिपोस्ट केली आणि त्यावर हृदयाच्या आकारेच इमोजी वापरत त्याच्याप्रती प्रेम व्यक्त केलं. मलायका आणि अर्जुन या दोघांनीही मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या या गोवा व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. ते पाहता, नव्या वर्षाचं स्वागच अगदी दणक्यात करत हे सेलिब्रिटी कपल काही खास क्षण एकमेकांसह व्यतीत करत आहेत हेच पाहायला मिळत आहे.
2019 मध्ये दिलेली नात्याची कबुली
मलायका आणि अर्जुननं 2019 मध्ये त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. न्यूयॉर्क व्हेकेशनदरम्यान त्यांनी या नात्याची ग्वाही दिली होती. फिल्मफेअरला मलायकासोबतच्या नात्याबाबत सांगताना अर्जुन म्हणालेला, 'आम्ही जाहीरपणे हे सांगतोय, कारण माध्यमानी आम्हाला तितकं मोठेपण दिलं आहे. माध्यमामध्येही एक प्रकारचा समजुतदारपणा आहे. ते कायमच या नात्याप्रती आदरपूर्वक, प्रामाणिक आणि सामंजस्यपूर्ण भूमिकेत दिसले. त्यामुळंच मला या नात्याबाबत सहजता वाटते, असं तो म्हणाला होता.