wedding anniversary | किरणसाठी आमिरने गायलं, 'तुम बिन जाऊ कहाँ...'
परफेक्शनिस्ट आमिरचा हा रोमँटीक अंदाज अनेकदा पाहायला मिळतो. पण, यावेळी त्यानं गायकाच्या रुपात किरणला खऱ्या अर्थानं सरप्राईज दिलं असंच म्हटलं जात आहे.
मुंबई : अभिनेता aamir khan आमिर खान, हा परफेक्शनिस्ट या नावानंही कलाविश्वात ओळखला जातो. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असण्यासोबतच तो एक पती आणि पिता म्हणूनही आपली जबाबदारी तितक्याच समर्पकतेनं पार पाडत असतो. असा हा अभिनेता सध्या त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहे.
सोशल मीडियावर या क्षणांची झलकही पाहायला मिळत आहे. आमिरनं नुकताच त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या 15 वाढदिवसानिमित्त एका खास सेलिब्रेशनचंही आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये आमिर- किरणसह त्यांचा खास मित्रपरिवार आणि कुटुंबीय दिसत होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फॅन पेज मार्फतही या सेलिब्रेशनमधील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आले. जिथं आमिर आणि किरण अॅनिव्हर्सरी केक कापताना दिसत आहेत. तर, आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये आमिरचा रोमँटीक अंदात पाहायला मिळत आहे. जिथं आमिर काही सुरेख गाणी गाताना दिसत आहे. जुनी आणि नवी गाणी गात असताना आमिरचा हा अंदाज पाहता त्याच्या आणि किरणमध्ये असणाऱ्या नात्याप्रतीच्या भावनाच या स्वरांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.
View this post on Instagram
आमिर आणि किरणच्या अॅनिव्हर्सरीमध्ये त्याची मुलगी इरा खान हिचीही उपस्थिती होती. शिवाय आमिरचा भाचा, अभिनेता इमरान खानही यावेळी तिथं हजर होता.
आमिर आणि किरणच्या नात्याविषयी सांगावं तर, 2005 मध्ये रीना दत्ताशी विभक्त झाल्यानंतर 2005 मध्ये आमिरनं किरणशी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला होता. किरण ही निर्माती आणि दिर्गदर्शिका असण्यासोबतच एक लेखिकाही आहे. आमिर आणि किरण हे त्यांच्या नात्याच्या माध्यमातून अनेकांपुढं एका आदर्श जोडीचा आदर्श ठेवत आहेत.