वयाच्या 36 व्या वर्षी लग्न न करताच आई झाली अभिनेत्री, नंतरच्या काळात 2 विवाह; पण एकही मुलं झालं नाही
Bollywood : बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जिने दोनदा विवाह केला. मात्र, एकदाही आई झाली नाही. जेव्हा तिने मुलीला जन्म दिला, तेव्हा तिचा जोडीदार देश सोडून गेला आणि तिने एकटीने मुलीचे संगोपन केले.

Bollywood : चित्रपटांसोबतच प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्यातही खूप रस असतो. त्यामुळेच नेहमी कलाकारांबद्दल काही ना काही गॉसिप ऐकायला मिळते. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचं लग्न, मुलं आणि कुटुंबाविषयी जाणून घेण्यात खूपच उत्सुकता असते. अशीच एक अभिनेत्री होती जिने चित्रपटसृष्टीत अनेक दशके घालवली. ती तिच्या कामाबरोबरच कुटुंबामुळेही चर्चेत राहिली.
खरं तर ही अभिनेत्री लग्न न करता आई झाली होती. तिने एकटीनेच आपल्या मुलीचे संगोपन केले आणि तिला स्वतःचेच नाव दिलं. खऱ्या आयुष्यात कधी आईचं भूमिका निभावली तरी कधी वडिलांचं. ही प्रसिद्ध अभिनेत्री केवळ 36 व्या वर्षी लग्न न करता आई बनली होती. त्यानंतर तिने 49 व्या वर्षी दुसरा जोडीदार निवडला. ही अभिनेत्री कोण आहे? जाणून घेऊयात.
ही अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. सध्या त्या ‘पंचायत 4’ या वेब सिरीजमुळे चर्चेत आहेत. पुन्हा एकदा त्या या सिरीजमध्ये मंजू देवीच्या भूमिकेत दिसल्या. मात्र या वेळी त्या महिला सरपंचपदाची निवडणूक हरल्या. तरीही वेब सिरीजमधील नीना गुप्ताच्या कामाचं कौतुक झालं.
नीना गुप्ता यांचा जन्म 4 जून 1959 रोजी कोलकात्यात झाला. 1982 मध्ये आलेल्या ‘साथ साथ’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांच्या अभिनयाला लगेचच लोकांकडून प्रतिसाद मिळाला आणि त्यांना अनेक संधी मिळाल्या.
आपल्या करिअरमध्ये नीनांनी आमिर खान, नसीरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. विशेष बाब म्हणजे ज्या वर्षी नीनांनी पदार्पण केलं, त्याच वर्षी त्या 6 चित्रपटांमध्ये झळकल्या. 1982 पासून आजपर्यंत त्यांचा प्रवास सुरू आहे.
या काळात त्यांनी 3 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. एक वेळ अशीही आली होती, जेव्हा त्यांच्या जवळ कामांची कमतरता होती. पण त्या नेहमीच खुलेपणाने काम मागत असत. आणि 2018 मध्ये ‘द लास्ट कलर’ आणि ‘बधाई हो’ या चित्रपटांमुळे त्यांनी मोठी पुनरागमन केली.
‘वो छोकरी’ (1994) आणि ‘उंचाई’ (2022) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहनायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे ‘बाजार सीताराम’ (1993) साठी दिग्दर्शकाला ‘सर्वोत्तम पदार्पण गैर-फीचर फिल्म’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
सिनेमाच्या पलिकडे, नीनांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्या 36 व्या वर्षी लग्न न करता आई झाल्या. नीना गुप्ता यांची दोन लग्नं झाली, पण त्या दोन्ही लग्नांतून त्यांना मूल झालं नाही. त्यांचे पहिले लग्न कॉलेजच्या काळात IIT-दिल्लीचे विद्यार्थी अमलान कुसुम घोष यांच्याशी झालं होतं. दोघांची भेट संस्कृतमध्ये मास्टर्स करताना झाली होती. त्यांनी आर्य समाजातील पद्धतीने लग्न केलं होतं, पण हे लग्न एक वर्षही टिकलं नाही. नंतर त्यांनी 2008 मध्ये विवेक मेहरा यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी नीना गुप्ता यांचं वय 49 वर्षे होतं.
नीना गुप्ताला एक मुलगी आहे — मसाबा गुप्ता. ही मुलगी त्यांच्या कोणत्याही लग्नातून झाली नाही, तर ती त्यांच्या लिव-इन पार्टनर कडून झाली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला असताना नीनाची भेट मुंबईत एका पार्टीत कर्णधार विव रिचर्ड्स यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांचं भेटणं वाढलं आणि 1980 च्या दशकात त्यांनी डेटिंग सुरू केलं. काही दिवसांनी नीना गुप्ता विव रिचर्ड्ससोबत लग्न न करता राहू लागल्या आणि त्यांचं नातं खूप चर्चेत आलं.
त्यावेळी विव रिचर्ड्स आधीच विवाहित होते आणि त्यांना दोन मुलंही होती. नीनांनी त्यांच्याशी लग्न केलं नाही कारण त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिला होता. रिचर्ड्स पुन्हा त्यांच्या देशात परतले. इथे नीना गुप्ता एकट्याने समाजाच्या टीका सहन करत, काम केलं आणि आपल्या मुलीचं संगोपन केलं.
49 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. या दोघांचं सहा वर्ष प्रेमसंबंध होते आणि 2008 मध्ये लग्न झालं. आज 66 वर्षांच्या असूनही नीना गुप्ता सतत चर्चेत असतात. त्या स्वतःच्या अटींवर जीवन जगतात आणि धडाकेबाज अंदाजात दिसतात. कधी स्कर्टमध्ये, तर कधी वन पीसमध्ये, आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांचा हा बिनधास्त स्वभाव फारच आवडतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या























