एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी सिझन 6 चा ग्रँड फिनाले 19 एप्रिलला होणार. 5 पैकी एक स्पर्धक एलिमिनेट होणार.

Bigg Boss Marathi 6 Elimination This Week: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनला (Bigg Boss Marathi) प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या घरात बरेच टास्क पार पडले. टास्कमुळे बिग बॉस या शोला रंगत आली. स्पर्धकांमध्ये कधी प्रेम फुलले तर, कधी मैत्री वाढली.  बिग बॉस मराठीचा सहावा सिझन हा आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. माहितीनुसार, बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात, ग्रँड फिनालेच्या (Grand Finale) जवळ पोहोचताना 7 स्पर्धक उरले आहेत.  इतर तगडे स्पर्धक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या कमी मतांमुळे बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाले आहेत.  दरम्यान,  तन्वी कोलतेनं (Tanvi Kolte) तिकीट टू  फिनालेचा मान मिळवला आहे.  दरम्यान, या आठवड्यात नेमका कुणाचा या घरातून प्रवास संपणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, या  आठवड्यात विशाल कोटियन किंवा राखी सावंत बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट होण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 रोजी होणार आहे

बिग बॉसची ट्रॉफी कोण पटकावणार (Bigg Boss Marathi Season 6)

बिग बॉस मराठीच्या ट्रॉफी  जिंकण्याच्या शर्यतीत 7 स्पर्धक उरले आहेत. विशाल कोटियन, राखी सावंत, राकेश बापट, दिपाली सय्यद, अनुश्री माने, तन्वी कोलते आणि रेवा कौरासे हे स्पर्धक विजेतेपदासाठी शर्यतीत आहेत. तिकीट टू फिनालेचा मान तन्वी कोलतेनं पटकावला. तिनं राकेश बापटला हरवून फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला आहे. तसेच तिला या आठवड्यात  नॉमिनेशनमधून  इम्युनिटी (सरंक्षण) देखील मिळालं आहे.   हाऊस कॅप्टन रेवा कौरसे देखील सुरक्षित आहे. उरलेले 5 स्पर्धक राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि राखी सावंत   हे  सर्व स्पर्धक नॉमिनेट झाले असून, यापैकी एक स्पर्धक या आठवड्यात एलिमिनेट होण्याची शक्यता आहे.

विशाल कोटियनवर एलिमिनेशनची टांगती तलवार कायम (Vishal Kotian vs Rakhi Sawant Elimination News)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  या आठवड्यात राकेश बापट प्रेक्षकांचा आवडता उमेदवार ठरला आहे. अनुश्री माने देखील सेफ होऊ शकते.   दिपाली सय्यद देखील  सेफ झोनमध्ये येण्याची चिन्हे आहेत.   इंटरनेटवरील ऑडियन्स सपोर्ट रिपोर्टनुसार, ही माहिती समोर आली आहे.  दरम्यान, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. माहितीनुसार,  विशाल कोटियन आणि राखी सावंत या दोन स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाला कमी मतं पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  दोघांपैकी एक स्पर्धक एलिमिनेट  होण्याची शक्यता आहे.  काही दिवसांपूर्वी विशाल कोटियन आणि राकेश बापटमध्ये राडा झाला. यामुळे राकेश बापटला एका आठवड्यासाठी आणि  विशाल कोटियनला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. रविवारी होस्ट रितेश देशमुखचा भाऊ धक्का पार पडेल.  यात कोणता स्पर्धक एलिमिनेट होईल, हे लवकरच स्पष्ट होईल. 

सात स्पर्धक साजरा करणार बिग बॉसचा वाढदिवस

विकेंड ट्विस्टमध्ये स्पर्धकांना एक हलका फुलका क्षण अनुभवायला मिळणार आहे. सर्व सात स्पर्धक  एकत्र येऊन बिग बॉसचा वाढदिवस साजरा करतील. दरम्यान, सर्व स्पर्धकांच्या मनात एलिमिनेशनची धाकधूक कायम राहिल. '

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सतीश शहांच्या पिंडदानाबाबत 'साराभाई vs साराभाई' फेम अभिनेत्यानं केला भावनिक खुलासा; म्हणाले " मुलं नसल्यानं ...'

महत्त्वाच्या बातम्या

Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget