एक्स्प्लोर

Rajesh Kumar: सतीश शहांच्या पिंडदानाबाबत 'साराभाई vs साराभाई' फेम अभिनेत्यानं केला भावनिक खुलासा; म्हणाले " मुलं नसल्यानं ...'

सतीश शाह यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीतील अनेकांना धक्का बसला.

Rajesh Kumar on Satish Shah: हिंदी टेलिव्हिजन आणि फिल्मी जगताचा दिग्गज अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांच्या निधनाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संपूर्ण चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर आयोजित ट्रिब्यूट सेरेमनीमध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आता साराभाई VS साराभाई मालिकेत सतिश शहा यांच्यासोबत काम केलेले अभिनेते राजेश कुमार (Rajesh Kumar)यांनी एक भावनिक खुलासा केला. ‘साराभाई वर्सेस साराभाई’च्या टीमने सतिश शहा यांचं पिंडदान केल्याचं त्यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय.

मुलं नसल्याने टीमने उचलली जबाबदारी

साराभाई vs साराभाई मध्ये सतीश शाह यांच्यासोबत काम केलेल्या राजेश कुमारने सांगितलं की, सतीश शाह आणि त्यांच्या पत्नीला मुलं नव्हती. त्यामुळे त्यांच्या आत्मशांतीसाठी शोमधील सहकलाकारांनी पुढाकार घेत पिंडदान केलं.

राजेश कुमार म्हणाले, “सतीश सर खूपच उत्साही आणि दिलदार व्यक्ती होते. त्यांनी कधीही आपल्या शारीरिक त्रासाचा परिणाम कामावर होऊ दिला नाही. ते डायलिसिसवर होते, किडनी ट्रान्सप्लांटही झालं होतं, पण त्यांनी कधीही निराशा दाखवली नाही. त्यांनी आयुष्य राजासारखं जगलं. सतीश शाह शम्मी कपूर यांच्यापासून खूप प्रेरित होते." राजेश कुमार यांनी पुढे सांगितलं " आजही ‘साराभाई’ ग्रुपमध्ये मेसेज करताना सतीश शाह यांची आठवण निघतेच. “जर ते आज असते, तर राकेश बेदी यांना मिळणाऱ्या यशामुळे त्यांना खूप आनंद झाला असता,” असंही त्यांनी सांगितलं.

निधनाचं खरं कारण काय?

सुरुवातीला सतीश शाह यांचा मृत्यू किडनी फेल्युअरमुळे झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, राजेश कुमारने नंतर स्पष्ट केलं की, त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालेलं.

सतीश शाह यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. जाने भी दो यारो, में हूं ना, रा.वन, इश्क विश्क आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यांसारख्या चित्रपटांत त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या. सतीश शाह यांचं दिलदार व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची छाप आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे.त्यांचे डायलॉग्स आजही खळखळून हसवतात. सतीश शाह यांनी 25 ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांचं अकाली जाणं फिल्म जगताला खूप मोठा धक्का होता. पण, तरीसुद्धा त्यांनी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमधून ते कायम चाहत्यांच्या मनात असतील.

हेही वाचा:

Rajesh Kumar: अभिनय सोडून शेतीत गेले,डोक्यावर 2 कोटींचं कर्ज; मुलांची फी भरण्यासाठी विकली भाजी, लोकप्रिय अभिनेत्याने 'असं' फेडलं कर्ज

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget