एक्स्प्लोर

आता नियम धाब्यावर बसवले का? 'बिग बॉस मराठी'च्या टॉप 5 मध्ये गेलेल्या अभिनेत्याचा सवाल, म्हणाला...

bigg boss marathi 6: त्या सीजनमध्ये असलेले कलाकार हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत होते. त्यामुळे माझ्या नंतरचा सीजन कसा होता आणि काय होता,व त्याचं रेटिंग काय? हे मी बोलण्याची गरज नाही."

Sushant Sheelar: सध्या मराठी टेलिव्हिजनवर बिग बॉस मराठीची एकच चर्चा आहे. बिग बॉस मराठीचे सहावे पर्व प्रचंड वादळी ठरत आहे. घरातील स्पर्धकांचे हेवेदावे, आरोप, एकमेकांवर केलेली चिखलफेक, भांडण आणि नॉमिनेशन टास्क दिवसेंदिवस रंगू लागले आहेत. बिग बॉसचा हा सहावा सीजन आहे. या सीजनची जेवढी उत्सुकता प्रेक्षकांना आणि चहा त्यांना आहे तेवढीच अधिक ते बिग बॉसच्या मागील पर्वातील स्पर्धकांनाही आहे. बिग बॉसमध्ये जाऊन आलेले अनेक कलाकार या सीजनवर व्यक्त होताना दिसत आहेत. दरम्यान बिग बॉसच्या पहिल्या सीजनमध्ये जाऊन आलेला सुशांत शेलार यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत बिग बॉसच्या आत्ताच्या सीजनविषयी आपलं मत व्यक्त केलंय. 'मला अनेक नियम दाखवून सोडावा लागला, पण नंतरच्या सिझन्समध्ये बरेच लोक जात होते, येत होते.. तेव्हा का नियम धाब्यावर बसवले? असा सवाल त्यांनी बिग बॉसवर केला. 'कितीही काही नाही म्हटलं तरी आपण थोडा वेळ तरी बिग बॉस बघतो. मी बिग बॉसच्या घरात जाऊन आलोय, त्यामुळे इतर स्पर्धक कसे आहेत, कसे खेळत आहेत त्यांचं काय चाललं आहे यापेक्षा त्या घरात जाऊन आल्यामुळे बिग बॉसचं घर बघण्याचा मोह होतो आणि ते घर बघताना त्यातील सदस्य, नमुनेही बघायला मिळतात.'

सुशांतचा बिग बॉसला सवाल

"मला असं वाटतं की मी कुठल्या सीजन विषयी बोलण्यापेक्षा...पहिला सिझन कसा होता आणि तो किती लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्या सीजनमध्ये असलेले कलाकार हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत होते. त्यामुळे माझ्या नंतरचा सीजन कसा होता आणि काय होता,व त्याचं रेटिंग काय? हे मी बोलण्याची गरज नाही." असंही सुशांत म्हणाला. राजश्री मराठीला तो बोलत होता.

"मला तर नियम दाखवले. सगळ्या गोष्टी कशा काटेकोरपणे पाळाव्या लागतात हे सांगण्यात आलं. तुला लीलावतीला जाऊन सिटीस्कॅन करता येणार नाही. लोणावळा सिटी सोडता येणार नाही असे नियम दाखवून मला तो शो सोडावा लागला. त्यानंतरच्या सीजनमध्ये अनेक लोक जात होती येत होती.. मग तेव्हा का नियम धाब्यावर बसवले?" असा सवाल सुशांतने बिग बॉसवर केला.

बिग बॉसच्या स्पर्धकांवर म्हणाला ..

"मला असं वाटतं की तलवारी कोलते खूप फेअर खेळत आहे. सगळ्यांना सामावून घेत आहे. जेवण बनवते. टास्क पण खेळत आहे. सगळे आदेश पत्र पण तीच वाचत आहे. आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. आमच्या बाजूच्याच गावाची आहे. त्यामुळे ती जिंकेल असं मला वाटतं. किमान टॉप फाइव्हमध्ये ती जाईल असं मला वाटतं. सुशांत म्हणाला. तिच्यासाठी शुभेच्छाही त्याने दिल्या.

कोणता स्पर्धक जिंकेल ?

बिग बॉसमधील कोणाला बघून डोक्यात सणक जाते असे विचारल्यानंतर सुशांत म्हणाला "सणक जात नाही,पण रुचिता ज्या पद्धतीने खेळते . ती गेम म्हणून खेळत आहे.तिला गेम कळला आहे. ती जोशने आणि होशने खेळत आहे. बिग बॉसच्या घरात अनेक स्पर्धक आवाज चढवताना दिसतात. त्या त्यावेळेसच्या सिच्युएशनवर तो राग असतो असं सुशांत म्हणाला.कोणी कोणी मनापासून व्यक्त होतं.राग व्यक्त करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. तो गेमचाच पार्ट आहे असं सुशांत म्हणाला .बिग बॉसच्या घरात राखी सावंत आल्यानंतर घराचं पूर्ण वातावरण बदललं आहे. राखी प्रचंड इंटरटेनिंग आहे. राखी घरात आली की गोष्टी घडतात. तिला बघताना मजा येते" असं हे सुशांत म्हणाला. 

'बिग बॉसच्या नव्या पर्वात टास्कच नाहीत'

"बिग बॉसच्या या घरात टास्कच दिसत नाहीत. सगळे स्पर्धक एकतर पोहे खात असतात चिप्स खात असतात नाहीतर भांडत असतात . पण बिग बॉसच्या घरात टास्क पाहिजेत. आमच्या वेळी बिग बॉसच्या घरात पोहे साखर यासाठी आम्हाला भीक मागावी लागायची. आमच्या सीझनमध्ये वॉशिंग मशीन पण नव्हती. आम्ही स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचो. आमच्या पर्वत खूप कडक होते. नंतरच्या सीजनमध्ये बिग बॉसला इतके स्ट्रॉंग स्पर्धक मिळाले नसतील जे त्यांचे कडक नियम पाळू शकतील.असं सुशांत म्हणाला. आता पुन्हा जर बिग बॉस ने बोलावलं तर तितके ताकदीचे कलाकार असल्याशिवाय मी जाणार नाही. आत्ताच्या लोकांसोबत जाण्याची माझी पात्रता नाही" असं सुशांत म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget