Bigg Boss Marathi 6: बिग बॉस 19 संपताच बिग बॉस मराठी येणार? कलर्स मराठीच्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता ताणली
उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येतंय! असं शीर्षक टाकत कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे.

Bigg Boss Marathi 6: सध्या कलर्स टीव्हीवर सुरू असलेल्या ' बिग बॉस 19'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. बिग बॉसचा एकोणिसावा सीजन आता शेवटच्या टप्प्यात जात आहे. लवकरच या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. दरम्यान कलर्स मराठीवर शेअर करण्यात आलेल्या एका प्रोमोमुळे बिग बॉस मराठीचा 6वा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. काहीतरी धमाकेदार येतंय या शीर्षकाखाली हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रोमोखाली चाहत्यांनी कमेंट करत बिग बॉस मराठीचा 6वा सीजन सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय.
बिग बॉस मराठीचे आत्तापर्यंत 5 सीजन झाले आहेत. 5व्या सीजनच होस्टिंग रितेश देशमुखनं केलं होतं. सुरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला होता. या पर्वातील सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्यामुळे कलर्स मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी बिग बॉस सुरू होणार असल्याची चर्चाय. पण अद्याप यावर अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे खरंच बिग बॉस मराठी सुरू होणार की दुसराच कुठला शो येणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे .उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येतंय! असं शीर्षक टाकत कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अनेक कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते. फिनालेच्या रांगेत सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आणि सुरज चव्हाण होते. यात सुरज चव्हाण बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. आता बिग बॉस 6 कधी सुरू होतोय? यावर्षीही रितेश देशमुखच होस्ट करणार का? कोणत्या कोणत्या कलाकारांना बिग बॉसच्या घरात जाण्याचा चान्स मिळेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे.























