एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: आईच्या आठवणीत राखी सावंत ढसाढसा रडली, अनुश्री अन् प्राजक्ता फिदीफिदी हसल्या; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा राग विकोपाला, म्हणाली...

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसनं दिलेल्या एका टास्कमध्ये घरातील सदस्यांना पुरून उरणारी राखी सावंत मात्र, ढसाढसा रडताना दिसली. पण, प्राजक्ता आणि अनुश्री मात्र फिदीफिदी हसताना दिसल्या.

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन (Bigg Boss Marathi 6) सध्या चांगलाच चर्चेत आहे. सीझन सुरू होऊन आता तब्बल सहा आठवडे उलटले आहेत. अशातच आता या शोमध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतची (Rakhi Sawant) एन्ट्री झाली आहे. राखीच्या येण्यानं घरातली पूर्ण समीकरणंच पार बदलून गेलीत. राखी सतत घरात काहीतरी करते आणि सदस्यांना धारेवर धरते. पण, बिग बॉसनं दिलेल्या एका टास्कमध्ये घरातील सदस्यांना पुरून उरणारी राखी सावंत मात्र, ढसाढसा रडताना दिसली. राखीला रडताना पाहून घरातील सदस्यांच्या डोळ्यांतही अश्रू तराळले, एवढंच काय तर प्रेक्षकही भावूक झाले. पण, त्याचवेळी घरातील प्राजक्ता शुक्रे (Prajakta Shukre) आणि अनुश्री माने (Anushri Mane) या दोघीजणी हसत होत्या.

बिग बॉसच्या कॅमेऱ्यांनी नेमकं हेच हेरलं. प्राजक्ता आणि अनुश्रीचं वागणं अनेकांना खटकलं आहे. दोघींवर जोरदार टीका होत असतानाच आता मराठी अभिनेत्रीनं दोघींना फटकारलं आहे. मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेनं (Rupali Bhosale) सोशल मीडियावर पोस्ट करुन दोघींचा समाचार घेतला आहे.  

राखी सावंत आईच्या आठवणीनं व्याकूळ होऊन रडत असताना अनुश्री माने आणि प्राजक्ता शुक्रे फिदीफिदी हसत होत्या. ते पाहून मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेला राग अनावर झाला. रुपालीनं सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रुपाली भोसले चिडली, काय म्हणाली?

रुपाली भोसले राग व्यक्त करताना म्हणाली की, "खरंच... अनुश्री-प्राजक्ता? प्राजक्ता तू तर खूप बोलतेस, माणुसकीबद्दल... मग आता कुठे गेली गं? आणि अनुश्री तू खरंच हार्टलेस आहेस का? राखी कॉमेडी करत होती का? अगं मग तू विशालला बाद केलंस तेव्हा का रडलीस? ते ही हसण्यासारखंच होतं. प्राजक्ता तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..." पुढे रुपालीनं त्याच टास्कचा एक फोटो शेअर केलाय. 

Bigg Boss Marathi 6: आईच्या आठवणीत राखी सावंत ढसाढसा रडली, अनुश्री अन् प्राजक्ता फिदीफिदी हसल्या; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा राग विकोपाला, म्हणाली...

राखीनंतर अनुश्री कन्फेशन रुममध्ये जाऊन तिच्या बाबांना फोन लावते. हा फोटो रुपालीनं शेअर केलाय आणि म्हणाली की,"प्राजक्ता आता हस आणि अनुश्री तूही हसत हसत बोल. किती खोटे आहात तुम्ही? एखाद्याचं व्यक्त होणं तुमच्यासाठी मस्करी? आणि तुम्ही जेव्हा व्यक्त होता ते मात्र खरं... हा विनोद आहे का तुमच्यासाठी?", असं म्हणत रुपालीनं अनुश्री आणि प्राजक्ताचा समाचार घेतला आहे.

टास्कदरम्यान नेमकं घडलं काय?

बिग बॉस मराठीच्या घरात एक टास्क दिला जातो. ज्यात घरातील कन्फेशन रूममध्ये एक खोटा टेलिफोन ठेवला गेला. त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्यानं कन्फेशन रूममध्ये जाऊन आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करून त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायच्या असतात. यादरम्यान बिग बॉस राखी सावंतला कन्फेशन रूममध्ये बोलावतात. राखी कन्फेशन रुममध्ये जाऊन तिच्या आईला फोन लावते. काही वर्षांपूर्वीच राखीच्या आईचं निधन झालंय. राखी तिच्या आईला फोन लावते आणि ढसाढसा रडू लागते. राखीला रडताना पाहून घरातील अनेक सदस्यांच्या डोळ्यांत अश्रू तराळतात, पण त्यावर प्राजक्ता शुक्रे आणि अनुश्री माने हसू लागतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Deepali Sayyad Mother In Law Passed Away: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; पण कुटुंबीयांनी कळवलंच नाही, कारण...

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget