Bigg Boss 19: बाबा बेस्ट कामगार, कधीकाळी घरोघरी पोहोचवले जेवणाचे डब्बे; इंजिनिअरिंग केलं, तरी RJ म्हणून काम केलं मग ट्रॅक चेंज केला अन्... मराठमोळा प्रणीत मोरे कोण?
बीबी19 च्या टॉप स्पर्धकांमध्ये पोहोचला; मराठमोळा प्रणित मोरे किती शिकलाय? जाणून घ्या त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड, करिअर आणि बिग बॉसपर्यंतचा प्रवास

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ने या वर्षी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. सगळ्या स्पर्धकांपैकी ज्याची अधिक चर्चा झाली ते स्पर्धक म्हणजे मराठमोळा प्रणित मोरे.(Pranit More) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारा प्रणित हा लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन, रेडिओ जॉकी आणि कंटेंट क्रिएटर आहे. त्याच्या विनोदी टाइमिंगमुळे आणि एकदम मस्त, स्ट्रेटफॉरवर्ड स्वभावामुळे त्याला मोठी ओळख मिळाली आहे. अनेकदा तो आपल्या स्टँड-अप शोमध्ये सलमान खान यांच्यावर हलक्या-फुलक्या शैलीत विनोद करतो आणि आता त्याच सलमानच्या घरात तो स्पर्धक म्हणून दाखल झाला होता. त्यामुळे त्याचा बिग बॉसमधील प्रवास प्रेक्षकांसाठी आणखीच उत्सुकता निर्माण करणारा होता.
प्रणित मोरे किती शिकलाय?
प्रणित मोरेचा जन्म मुंबईत झाला असला, तरी त्याच मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड़ आहे. त्याचे वडील स्टेट ट्रान्सपोर्ट (एसटी) महामंडळात कंडक्टर म्हणून काम करत होते, तर आई गृहिणी आहे. आर्थिकदृष्ट्या साध्या कुटुंबातून आलेल्या प्रणितने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख तयार केली.
त्यानं शिक्षण मुंबईतील के.जे. सोमैया कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समध्ये पूर्ण केले. येथे त्याने बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) पदवी घेतली. पुढे त्याने वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मार्केटिंगमध्ये एमबीए पूर्ण केला. लहानपणापासून त्यांची इच्छा पायलट बनण्याची होती. पण पायलट कोर्समध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांनी 6 महिन्यांचा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियरिंग कोर्स केला. मात्र हा कोर्सही त्यांनी नंतर सोडला.
जॉबवरून काढून टाकलं, स्टँडअपमध्ये यश मिळालं
आपल्या प्रवासाविषयी सांगताना प्रणित म्हणाला, MBA केल्यानंतर मला दुसरा जॉब मिळाला. चार वर्ष मी तिकडे जॉब केला. पण 2019 मध्ये मला त्या कामावरून काढण्यात आलं. मी त्या जॉबवर खूपच अवलंबून होतो. त्यावर माझा आणि घरच्यांचा खर्च भागत होता. नंतर मी स्टँडअप कॉमेडी सुरू केली. ज्यात मला बऱ्यापैकी यश मिळालं. पण जानेवारी 2025 मध्ये एक वाद झाला. माझ्या एका विनोदामुळे माझ्यावर हल्ला झाला होता. तो माझ्या आयुष्यातला वाईट काळ होता. तेव्हा मला अनेकांनी स्टँडअप वगैरे नको करू असे काही सल्ले दिले होते. पण मी पुन्हा स्टँडअप करणं सुरू केलं. मग जुलै 2025 मध्ये एक स्वप्न पूर्ण झालं. मी आई-वडिलांसाठी एक नवीन घर घेतलं. नंतर पुढच्या महिन्यातच मला ‘बिग बॉस’मधून कॉल आला आणि मी यात सहभागी झालो.”
आई वडिलांचा टिफीनचा व्यवसाय
मुंबईतल्या दादरमध्ये आम्ही एका चाळीत राहायचो. माझे वडील बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होते. पण त्यांच्या पायाला झालेल्या एका दुखापतीमुळे त्यांना तो जॉब सोडवा लागला होता. मग आम्ही दादरमधून नवी मुंबईमध्ये शिफ्ट झालो. तेव्हा पैसे नव्हते. त्यामुळे आम्ही एक छोटंसं घर घेतलं. तेव्हा आई-वडिलांनी मिळून टिफिनचा व्यवसाय सुरू केला.”
टिफिनच्या व्यवसायाबरोबरच वडील आणखी एक छोटासा व्यवसाय करत होते, ज्यात 2004 मध्ये नुकसान झालं. त्यामुळे एक आम्हाला आमचं छोटंसं दुकान आणि घर विकावं लागले. मग 2013 मध्ये मला एक जॉब मिळाला. ज्यात मी गाड्या विक्रीचं काम करत होतो. त्यानंतर 2017 मध्ये माझ्या एका शिक्षकांनी मला स्टँडअप कॉमेडीसाठी प्रोत्साहन दिलं आणि मी याकडे एक करिअर म्हणून बघितलं. तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता.
FM मध्ये कंटेंट क्रिएटर
2019 ते 2023 या काळात प्रणित मिर्ची एफएममध्ये रेडिओ जॉकी आणि कंटेंट क्रिएटर होता. या काळात त्याने फिल्मफेअर मराठी आणि फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्ससारखे मोठे कार्यक्रम होस्ट केले. 2023 मध्ये त्याने पूर्णवेळ स्टँड-अपमध्ये पाऊल टाकले आणि त्याचे ‘बाप को मत सिखा’ आणि ‘बॅक बेंचर’ हे शो प्रचंड लोकप्रिय झाले.
सोशल मीडिया स्टार
प्रणित मोरे आज सोशल मीडियावरील एक मोठे नाव आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 4 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.यूट्यूबवर 1 मिलियनपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स असून बिग बॉसच्या घरात टॉप थ्री स्पर्धकांमध्ये त्याने वर्णी लावली. या शोने प्रणितला घराघरात पोहोचवलं. आता ‘बिग बॉस 19’मध्ये जोरदार एन्ट्री झाली. त्याचा विनोदी अंदाज, बिनधास्त बोलण्याची शैली आणि स्पष्ट विचार यामुळे तो या सीझनचा मजबूत कंटेस्टंट बनू शकला.























