एक्स्प्लोर

Bigg Boss 19, Himanshi Narwal: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस 19'ची ऑफर?

Bigg Boss 19, Himanshi Narwal: नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल काश्मीरला फिरायला गेले होते. 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल शहीद झाले होते.

Bigg Boss 19, Himanshi Narwal: 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच यंदाच्या पर्वात बिग बॉसच्या घरात गोंधळ घालायला कोण कोण असणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच आता, कित्येकांच्या नावाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अशातच एका नावानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, ते ना म्हणजे,  हिमांशी नरवाल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack Case) प्राण गमावलेल्या विनय नरवाल (Vinay Narwal) यांची ती पत्नी आहे. दरम्यान, सलमान खानच्या (Salman Khan) शोची ऑफर हिमांशीला मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

‘टेली चक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’चे निर्माते हिमांशीला शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण तिची कहाणी भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांशी कनेक्ट होईल, असं त्यांचं मत आहे. “निर्माते काही अशा लोकांच्या शोधात आहेत, जे प्रेक्षकांशी लगेच कनेक्ट होऊ शकतील. त्यातच हिमांशी नरवालचं नाव चर्चेत होतं. परंतु हिमांशी निर्मात्यांना होकार दिला की नाही, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही”, अशी माहिती शोच्या सूत्रांनी दिली.

लग्नाच्या आठवडाभरातच पती शहीद 

नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल काश्मीरला फिरायला गेले होते. 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल शहीद झाले होते. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या आठवडाभरापूर्वीच विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं होतं आणि दोघंही हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते. पण, दुर्दैवानं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात विनय नरवाल शहीद झाले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाजवळ बसून रडतानाचा हिमांशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काळीज पिळवटणारा हा फोटो पाहून संपूर्ण देश हळहळला होता. 

मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेलाही ऑफर 

 दिग्गज मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यंदा बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता स्वतः उपेंद्र लिमये यांनी याबाबत खुलासा केला आहे. उपेंद्र लिमये यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय की, "बिग बॉसच्या नव्या पर्वात सहभागी होण्याबाबत मला अनेकांकडून विचारणा झाली. पण, मी सांगू इच्छितो की, मी या शोचा भाग नाही. तुमचा समजूतदारपणा आणि सपोर्ट यासाठी धन्यवाद"

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bigg Boss 19, Salman Khan: उपेंद्र लिमयेला 'बिग बॉस 19'ची ऑफर? अभिनेत्यानं सगळं खरं खरं सांगून टाकलं...

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget