एक्स्प्लोर

Bigg Boss 19, Salman Khan: उपेंद्र लिमयेला 'बिग बॉस 19'ची ऑफर? अभिनेत्यानं सगळं खरं खरं सांगून टाकलं...

Bigg Boss 19, Salman Khan: 'बिग बॉस 19' या सीझनची घोषणा झाल्यापासून सलमान खानचे विविध प्रोमो समोर आले आहेत. पण, अजूनही यंदा बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक दिसणार? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Bigg Boss 19, Salman Khan: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेला प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चं (Bigg Boss 19) नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाचं हे 19वं पर्व असून यावेळी घरात कोण कोण सामील होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या घरात कोणते चेहरे सामील होणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता एका मराठमोळ्या दिग्गज अभिनेत्याचं नावंही चर्चेत आहे. दिग्गज मराठी अभिनेता उपेंद्र लिमये (Marathi Actor Upendra Limaye) यंदा बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता स्वतः उपेंद्र लिमये यांनी याबाबत खुलासा केला आहे. 

'बिग बॉस 19' या सीझनची घोषणा झाल्यापासून सलमान खानचे विविध प्रोमो समोर आले आहेत. पण, अजूनही यंदा बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक दिसणार? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. असं असलं तरीसुद्धा अनेक सेलिब्रिटींच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच उपेंद्र लिमये सलमान खानच्या 'बिग बॉस 19' मध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे. 

अभिनेता उपेंद्र लिमये यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय की, "बिग बॉसच्या नव्या पर्वात सहभागी होण्याबाबत मला अनेकांकडून विचारणा झाली. पण, मी सांगू इच्छितो की, मी या शोचा भाग नाही. तुमचा समजूतदारपणा आणि सपोर्ट यासाठी धन्यवाद" उपेंद्र लिमयेनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता 'बिग बॉस 19'च्या पर्वात तो दिसणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Upendra Limaye (@upendralimaye)

पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या नौदल अधिकाऱ्याची पत्नीही होणार सहभागी? 

टेली चक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, 'बिग बॉस'चे निर्माते हिमांशीला शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण तिची कहाणी भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांशी कनेक्ट होईल, असं त्यांचं मत आहे. “निर्माते काही अशा लोकांच्या शोधात आहेत, जे प्रेक्षकांशी लगेच कनेक्ट होऊ शकतील. त्यातच हिमांशी नरवालचं नाव चर्चेत होतं. परंतु हिमांशी निर्मात्यांना होकार दिला की नाही, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही”, अशी माहिती शोच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, 'बिग बॉस 19'ची घोषणा झाल्यापासूनच अनेक नावं चर्चेत आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम गुरुचरण सिंग आणि शैलेश लोढा, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अपूर्वा मखिजा, गायक रफ्तार आणि नृत्यांगना धनश्री वर्माच्या नावाच्या चर्चा सुरू होत्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Most Expensive Divorce In Bollywood: बॉलिवूडचा सर्वात महागडा घटस्फोट; नातं संपवण्यासाठी अभिनेत्यानं दिलेले 380 कोटी; ओळखलं का कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Joru ka Gulam Director: घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
Bollywood Actor Post On Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
Surbhi Chandna On Pregnancy: 'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget