‘बिग बॉस 19’ मध्ये बेशरमपणाची परिसीमा! अमाल मलिकने तान्या मित्तलसोबत वाद घालताना केला ‘घाणेरडा इशारा’
कॅप्टनसी टास्क दरम्यान अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांच्यातील संभाषण थोडे तापले होते. याच वेळी अमालने घाणेरडा इशारा केलं जो tv वरही दाखवण्यात आला नाही.

Bigg Boss 19:'बिग बॉस 19' च्या घरात पुन्हा एकदा तापलेलं वातावरण पाहायला मिळालं. कॅप्टन्सी टास्कदरम्यान एकेकाळी चांगले मित्र असलेले अमाल मलिक आणि तान्या मित्तल आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. टास्कदरम्यान घराला राजकीय पक्षांच्या स्वरूपात विभागण्यात आलं होत . यात गौरव खन्ना, कुनिका सदानंद आणि शहबाज बदेशा यांना लीडर बनवण्यात आलं. फरहाना आणि तान्या यांनी कुनिकाची पार्टी जॉईन केली, मृदुल तिवारी आणि प्रणित मोरे गौरवच्या बाजूने गेले, तर मालती चहर आणि अशनूर कौर शहबाजच्या टीममध्ये सामील झाल्या. (entertainment)
बहुतेकांनी केला तान्याला विरोध
पहिला राऊंड गौरव खन्नाच्या टीमने जिंकला, तर दुसऱ्या राऊंडमध्ये कुनिकाची टीम विजयी ठरली. पण या दरम्यान अमाल आणि तान्या यांच्यातील वाद शिगेला पोहोचला. अमालने तान्याची खिल्ली उडवत म्हटलं की, “ती स्वतःला नेहमी खरी आणि सच्ची दाखवते.” त्यानंतर त्याने घरातील सदस्यांना विचारलं की, जर तान्या कॅप्टन्सी साठी उभी राहिली, तर तुम्ही तिला सपोर्ट कराल का? मात्र बहुतेक सदस्यांनी तान्याचा विरोधच केला.
हे ऐकून संतापलेल्या तान्याने अमालला “सर्वात मोठा खोटारडा आणि गद्दार” म्हटलं. एवढंच नाही तर कॅमेरासमोर तिने पुन्हा एकदा अमालला “भैया” म्हणत टोमणा मारला. यानंतर अमालने वल्गर जेस्चर करत म्हटलं, “हिला वाटलं मी ‘भैया’ म्हटलं की माझं हृदय तुटेल, पण मला काही फरकच पडला नाही.” हे पाहताच कुनिका सदानंदने त्याला ताबडतोब थांबवत म्हटलं, “शी… अमाल, तू अशी अॅक्शन कसं करू शकतोस?”नंतर फरहाना आणि तान्याने पुन्हा तो जेस्चर दाखवायला सांगितला, आणि अमालने तो पुन्हा करत म्हटलं, “जर चुकीचं असेल तर क्लास घेतीलच.” तान्याने प्रणितला विचारलं की, “अमालचं जेस्चर चुकीचं होतं ना?” पण प्रणित म्हणाला, “मी पाहिलंच नाही, त्यामुळे काही सांगू शकत नाही.” आता या वादग्रस्त प्रकारावर ‘वीकेंड का वार’ मध्ये सलमान खान काय भूमिका घेतात, आणि हा वाद किती मोठा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) मध्ये मिड-वीक धक्का बसला आहे. युट्यूबर मृदुल तिवारी घराबाहेर झाल्याची बातमी समोर आली आणि सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली. अभिषेक बजाजच्या एलिमिनेशनचा धक्का अजून चाहत्यांच्या मनातून गेला नाही तोवर मृदुलच्या आउट होण्याच्या बातमीने चाहते चांगलेच भडकलेत























