एक्स्प्लोर

Bigg Boss 19 Abhishek Bajaj Eviction Pranit More: 'प्रणीत मोरे विश्वासघातकी, मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला...'; अभिषेक बेघर झाल्यानं चाहत्यांचा संताप, मेकर्सनाही खरं खोटं सुनावलं

Bigg Boss 19 Abhishek Bajaj Eviction Pranit More: 'बिग बॉस 19' मध्ये विकेंड का वारमध्ये डबल इव्हिकेशन झालं. शोमधून नीलम गिरी आणि अभिषेक बजाज घराबाहेर पडले.

Bigg Boss 19 Abhishek Bajaj Eviction Pranit More: 'बिग बॉस 19'मध्ये (Bigg Boss 19) रविवारी न भूतो न भविष्यती एविक्शन पाहायला मिळालं. बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19 Show) 'वीकेंड का वार'मध्ये प्रणीत मोरेची (Pranit More) एन्ट्री झाली आणि त्यासोबतच त्याला काही विशेष अधिकार मिळाले. घरातील नॉमिनेटेड सदस्यांपैकी प्रणीतला एकाला वाचवणं शक्य होतं. बॉटम 3 मध्ये असलेल्या सदस्यांपैकी प्रणीतनं अशनूर कौरला सेफ केलं. त्यानंतर 'बिग बॉस 19'च्या घरात आजवरचं सर्वात शॉकिंग डबल एविक्शन झालं. अभिषेक बजाज (Abhishek Bajaj) आणि नीलम गिरी (Neelam Giri) दोघेही घराबाहेर आले. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. अभिषेकचं घराबाहेर (Abhishek Bajaj Eviction) पडणं चाहत्यांना फारसं आवडलं नाही आणि त्यांनी शोच्या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला. 

या आठवड्यात, 'बिग बॉस 19'मध्ये पाच स्पर्धकांना बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलेलं. यामध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांचा समावेश होता. होस्ट सलमान खाननं जाहीर केलं की, फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना सुरक्षित आहेत. यामुळे अशनूर, अभिषेक आणि नीलम हे बॉटम तीनमध्ये राहिले.

प्रणीतनं अशनूरला सेफ केलं अन्... 

त्यानंतर सलमान खाननं म्हटलं की, प्रणीत मोरेकडे विशेष अधिकार आहे आणि तो यापैकी एकाला वाचवू शकतो. कारण गेल्या आठवड्यात तो कॅप्टन होता आणि मेडिकल रिजनमुळे घराबाहेर आलेला. पण आता तो त्याचा विशेष अधिकार वापरू शकतो. यानंतर प्रणीत म्हणाला की, तो घेत असलेल्या निर्णयामुळे धक्का बसू शकतो... यानंतर त्यानं अशनूरचं नाव घेत, तिला सेफ केलं. त्यानंतर डबल एविक्शन असल्यामुळे अभिषेक आणि नीलम घराबाहेर पडले. 

प्रणीतच्या निर्णयानं संतापले फॅन्स

प्रणीत मोरेनं अशनूरला सेफ करण्याचा जो निर्णय घेतला, तो चाहत्यांना फारसा आवडला नाही. चाहते प्रणीतवर चिडले आणि त्यांनी आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली. सध्या ट्विटरवर अभिषेकचं नाव ट्रेंड करत आहे. प्रणीतनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे आणि त्यानं अभिषेकला वाचवायला हवं होतं, असं सर्वांचं म्हणणं आहे. अभिषेकनं दोन महिन्यात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  त्यामुळे तो ट्रॉफीच्या रेसमध्ये टिकायला हवा होता. 

अभिषेकसाठी चाहत्यांचे ट्वीट्स

'ऑडियंस का विनर' अभिषेक बजाज

प्रणीत मोरेवर चाहत्यांचा संताप 

प्रणित मोरेवर प्रेक्षक संतापले आहेत. प्रणीतनं फसवणूक आणि विश्वासघात केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. प्रणीतनं शोमध्ये अभिषेक मित्र असल्याचं नाटक केलं. त्यानं आपल्याच मित्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय अशा अनेक कमेंट्स चाहत्यांकडून केल्या जात आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget