Bigg Boss 16 Grand Finale Live: एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस 16'चा विजेता
शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस-16 चे फायनलिस्ट आहेत.

Background
Bigg Boss 16 Grand Finale Live: बिग बॉस 16 चा विजेता कोण, ही प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. बिग बॉसचे चाहते सीझन 16 च्या फिनालेसाठी खूप उत्सुक आहेत. शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस-16 चे फायनलिस्ट आहेत. यामधील कोणत्या स्पर्धक हा बिग बॉसचा विजेता ठरणार आहे? या प्रश्नाचं उत्तर बिग बॉसच्या चाहत्यांना मिळणार आहे. आज रात्री विजेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
'बिग बॉस 16'च्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल
'बिग बॉस'च्या या अतरंगी पर्वाचा विजेता शिव, अर्चना, प्रियांका, एमसी स्टॅन नसून 'बिग बॉस' स्वत: आहे. हे पर्व यशस्वी होण्यामागे बिग बॉसचा मोलाचा वाटा आहे. बिग बॉस स्वत: खेळणार यंदाचं पर्व असं म्हणत या पर्वाची घोषणा करण्यात आली होती. पण खेळ जसा पुढे गेला तसा या वाक्याचा अर्थ प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने कळला. स्पर्धकांमधील भांडण, वाद, टास्क आणि बिग बॉसची हटके खेळी या सर्व गोष्टींमुळे यंदाचं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. टीआरपीच्या शर्यतीतदेखील 'बिग बॉस 16'ने बाजी मारली आहे.
पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'चा दबदबा
'बिग बॉस' हिंदीचे 15 सीझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले असले तरी 16 वं पर्व मात्र वेगळं ठरलं आहे. 16 वं वरीस धोक्याचं असल्याप्रमाणे 'बिग बॉस'चं 16 वं पर्वदेखील स्पर्धकांसाठी धोक्याचं ठरू शकतं. 'बिग बॉस' घरातील प्रत्येक कामात तसेच सदस्यांना गरज असेल तेव्हा त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे एक चांगला खेळाडू म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे खेळ कसा बदलणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
'बिग बॉस 16'मध्ये 'मंडली'ची चर्चा
'बिग बॉस 16'मध्ये 'मंडली'ने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. सिने-निर्माता साजिद खानने मंडलीची निर्मिती केली होती. आता या मंडलीतील सहा सदस्यांपैकी शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोनच स्पर्धक 'टॉप 5'मध्ये पोहोचले आहेत. तर दुसरीकडे शालिन, प्रियांका आणि अर्चनाने आपल्या उत्तम खेळीने बिग बॉसच्या घरात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आता या पर्वाची ट्रॉफी कोणाला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
'हा' आहे बिग बॉस 16 चा विजेता?
बिग बॉस 16 चा विजेता कोण, ही प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. बिग बॉसचे चाहते सीझन 16 च्या फिनालेसाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान, बिग बॉसच्या स्पर्धकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. प्रियांका चहर चौधरीचा बिग बॉस ट्रॉफीसोबतचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तर, दुसरीकडे शिव ठाकरे जिंकल्याच्याही पोस्ट चर्चेत यासोबतच एमसी स्टॅनचा बिग बॉसच्या ट्राफीसोबतचा फोटोही जोरदार चर्चेत आहे. दरम्यान, यावरून प्रेक्षकांनी कोणताही निष्कर्ष काढू नये, कारण बिग बॉसचा अंतिम सोहळा आज रात्री पार पडणार आहे. बिग बॉस 16 चा फिनाले अजून झालेला नाही. आज रात्री विजेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
Big Boss 16 winner 🏆#ShivThakre #BiggBoss16
— Karan Verma (@KaranVe92313781) February 5, 2023
"MIGHTY WINNER SHIV" pic.twitter.com/97tnYar4Cc
Bigg Boss 16: शिव ठाकरेनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Bigg Boss 16: शिव ठाकरे हा बिग बॉस-16 चा विजेता ठरला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
Bigg Boss16: रितेश देशमुखचं खास ट्वीट; केलं सनी देओलचं कौतुक
Bigg Boss16: बिग बॉसचा 16 वा सिझनच्या ग्रँड फिनालेमध्ये सनी देओलनं हजेरी लावली. सनी देओलचं कौतुक करत रितेशनं खास ट्वीट सोशल मीडियावर शेअर केलं
Paaji @iamsunnydeol on #BiggBoss16Finale is just phenomenal… #gadar2inbiggbossfinale
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 12, 2023























