Big Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' च्या घरात होणार पहिली Wild Card Entry; 'या' स्पर्धकाला तुम्ही ओळखलंत का?
Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात एका मुलीची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री होणार आहे.
Big Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा (Big Boss Marathi 4) सीझन अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. बघता बघता या सीझनचे चार आठवडे पूर्ण झाले. सर्वच सदस्य अत्यंत उत्तम पद्धतीने गेम खेळताना दिसतायत. अशातच बिग बॉसने या खेळात नवीन ट्विस्ट आणला आहे. हा नवा ट्विस्ट म्हणजे बिग बॉस मराठी सीझन चारची आज पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) या घरात होणार आहे.
बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी दाखवलेल्या भागात या संदर्भात माहिती दिली. दाखविण्यात आलेल्या भागानुसार बिग बॉसच्या घरात एका मुलगी वाईल्ड कार्ड म्हणून घरात प्रवेश होणार आहे. मात्र, ही वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून घरात प्रवेश करणारी व्य्क्ती नेमकी कोण आहे या संदर्भात बिग बॉसच्या चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या दाखविण्यात आलेल्या या ट्रेलरनुसार येणारी नवीन वाईल्ड कार्ड स्पर्धक नेमकी कोण असेल? तिचा खेळ कसा असेल? ती टीम 'ए' ला जॉईन करेल की टीम 'बी' बरोबर आपला खेळ खेळेल? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाले आहेत. तर, चाहत्यांच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आज बिग बॉसच्या चावडीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
कोण होईल घराबाहेर?
बिग बॉसच्या घरात आतापर्यंत निखिल राजेशिर्के आणि मेघा घाटगे हे घरातून बाहेर पडले आहेत. आता उर्वरित सदस्यांपैकी योगेश जाधव, किरण माने, विकास पाटील, अमृता देशपांडे, त्रिशूल मराठे आणि प्रसाद जवादे हे सदस्य घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी आज घराचा कोण निरोप घेणार आणि त्याबरोबरच वाईल्ड कार्ड म्हणून कोण घरात येणार या दोन्ही गोष्टी पाहणं रंजक ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :