8 वर्षांत टप्पूचा बदललेला ‘अवतार’ पाहून सगळेच थक्क! तारक मेहता फेम भव्य गांधीची मिस्ट्री गर्ल कोण?
आज भव्य 28 वर्षांचा आहे. 9-10 व्या वर्षी अभिनय करणारा हा गोड, खोडकर टप्पू आता फिट, हँडसम आणि परिपक्व दिसतो.

Tarak Mehta ka Ulta Chashma: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये टप्पूची भूमिका करून घराघरात पोहोचलेला भव्य गांधी (Bhavya Gandhi) आज पूर्णपणे बदलला आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारा भव्य आता तरुण, स्मार्ट आणि आत्मविश्वासू अभिनेता दिसतो. त्याच्या लाइफमध्ये गेले काही वर्षे अनेक बदल झाले आहेत. दिशा वकानी यांच्यापासून टप्पू सेनेतील मित्रांपर्यंत सर्वजण त्याला पाहून हैराण आहेत.
शो सोडला अन् आयुष्यातील मोठं वळण आलं
भव्यने 2008 ते 2017 या काळात असित मोदी यांचा लोकप्रिय शो ‘तारक मेहता’ केला. त्यानंतर त्यांनी शो सोडला. त्या काळात त्यांच्यावर अनप्रोफेशनल वागणुकीचे आरोपही झाले होते. काही मुलींसोबत त्याचं नाव जोडल्याचा चर्चाही होती. मात्र भव्यने स्पष्ट सांगितले होते की हे सर्व खोटं आहे आणि तो स्वतःला ओळखण्यासाठी, लाइफ एक्सप्लोर करण्यासाठी शोमधून बाहेर पडला. भव्य गांधीने कोविड काळात वडील विनोद गांधी यांना गमावलं. तेव्हापासून त्यांची आई यशोदा गांधीच त्यांची काळजी घेत आहे. हे दुःख त्याच्या आयुष्यातील मोठं वळण ठरलं.

फिल्ममेकिंगचं स्वप्न आणि न्यूयॉर्क प्लॅन
भव्य आणि त्याचा मित्र, सहकलाकार कुश शाह फिल्ममेकिंग शिकण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार होता. काउंसलरशी मीटिंगसुद्धा झाली होती. मात्र परिस्थिती बदलली आणि कुश गेला; भव्य जाऊ शकला नाही. नंतर त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की कुश चांगलं करत असल्याचा त्याला आनंद आहे.
‘तारक मेहता’मधील फी आणि नेटवर्थ किती?
Koimoiच्या माहितीनुसार, भव्यला एका एपिसोडसाठी साधारण 10,000 रुपये मिळत होते. म्हणजे महिन्याला सुमारे 3 लाख रुपये.त्यांची नेटवर्थ 16 कोटी रुपये एवढी सांगितली गेली होती. 2013 पर्यंत त्यांनी शोमधून सुमारे 34 लाख कमावले होते.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भव्य म्हणाला,“दिशादीदीशी आमची आजही बोलणं होतं. कधी कधी व्हिडिओ कॉल करतो. मला दाढीत पाहून त्या चकित होतात. कारण त्यांनी मला कधीही दाढीमध्ये पाहिलं नव्हतं!”
मिस्ट्री गर्ल कोण? भव्यने उलगडली गूढ गोष्ट
भव्यसोबत दिसणारी 'मिस्ट्री गर्ल' कोण? त्याचं नाव रुचा आहे. भव्यने स्पष्ट केलं की ती त्याची “सीक्रेट गर्लफ्रेंड” नाही. दोघांची भेट एका रोड ट्रिपमध्ये झाली होती आणि ते चांगले मित्र आहेत. 2021 मध्ये त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.

आज भव्य 28 वर्षांचा आहे. 9-10 व्या वर्षी अभिनय करणारा हा गोड, खोडकर टप्पू आता फिट, हँडसम आणि परिपक्व दिसतो. त्याचा सुडौल शरीरयष्टी पाहून गोकुलधामचा तोच शरारती टप्पू आहे, हे चाहत्यांना पटतही नाही!
























