एक्स्प्लोर

April May 99: ‘थ्री इडियट्स’च्या टीमकडून ‘एप्रिल-मे 99’ ला शुभेच्छा! राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशीसह रितेश देशमुखने शेअर केला ट्रेलर

April May 99: ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावरून शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेलरमध्ये मैत्री, भावनांची गुंफण आणि नात्यांची गोडी अनुभवायला मिळत आहे.

April May 99: उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली असून ही सुट्टी अधिक कुल करण्यासाठी धमाल-मस्तीने भरलेला ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मापुस्कर ब्रदर्सच्या या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ‘थ्री इडियट्स’च्या टीमने म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी यांच्यासह महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून हा ट्रेलर शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेलरमध्ये  मैत्री, भावनांची गुंफण आणि नात्यांची गोडी अनुभवायला मिळत आहे. 

एप्रिल -मे महिना म्हटला की अनेक जण कोकणांत गावाला जातात. आपल्या माणसांमध्ये, मित्रांमध्ये, शेजारच्या घरी, कुठेही, कसेही मनसोक्त वावरता आणि बागडता येते.  ना वेळेचे बंधन ना कुठे जायचे बंधन. मस्त हुंदडत अख्खे गाव पालथे घालायचे. याच जुन्या आठवणीं ताज्या करण्यासाठी 'एप्रिल मे ९९' हा चित्रपट भेटीला येणार आहे. ‘एप्रिल मे ९९’ च्या ट्रेलरमध्ये कृष्णा, सिद्धेश आणि प्रसाद ही धमाल तिकडी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाली असतानाच त्यांच्या सुट्टीच्या प्लॅनवर पालक विरजण घालताना दिसत आहेत. या सुट्ट्यांमध्ये त्यांची भेट जाईशी होते. जाईला कोकण फिरवत, तिच्यासोबत दंगामस्ती, धमाल करत असतानाच या दरम्यान त्यांच्यात निर्माण होणारी मैत्री, मस्तीचे क्षण आणि काही भावनिक वळणे या ट्रेलरमधून उलगडताना दिसत असून कोकणातील पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट प्रेक्षकांना त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी आहे. निसर्गरम्य कोकणचे दर्शनही या निमित्ताने घडत आहे. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, '' आपल्यापैकी अनेकांनी मे महिन्याची सुट्टी अशा पद्धतीने घालवली आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची जागा 'व्हेकेशन्स'ने घेतली आहे. अर्थात बाहेर फिरायला जाण्यात काहीच गैर नाही. प्रत्येकाची सुट्टीची व्याख्या वेगळी असते. असे असले तरी प्रत्येकाने आयुष्यात अशी सुट्टी नक्कीच एन्जॉय करावी. दिवसभर गावात हुंदडत, विहिरीत डुबक्या मारत, सायकलवर अख्खे गाव पालथे घालत, खोडकरपणा करण्यातली मज्जाच काही और आहे. हेच दाखवण्याचा प्रयत्न 'एप्रिल मे ९९'मध्ये करण्यात आला आहे. मोठ्यांना त्यांच्या सुट्टीची आठवण करून देणारा, लहानग्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीची खरी व्याख्या सांगणारा आणि संपूर्ण कुटुंब एकत्र एन्जॉय करेल असा हा चित्रपट आहे.

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, '' ट्रेलर पाहाताना अनेकांना आपल्या घरातील कथा असल्याचा भास झाला असेल. हा चित्रपट प्रेक्षकांना जवळचा वाटण्याचे कारण म्हणजे आपल्यापैकी अनेक जण एप्रिल मेच्या सुट्ट्या एन्जॉय करायला दरवर्षी कोकणात जातात. कोकणातील उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच गंमतीशीर आणि धमाल असतात. त्यामुळे हा चित्रपट पाहून तुम्ही पुढची उन्हाळ्याची सुट्टी अशीच प्लॅन कराल. यात चार किशोरवयीन मुले दिसत असली तरी ही गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांची आहे. मला खात्री आहे हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नक्कीच यशस्वी होईल.  मुळात ‘एप्रिल-मे ९९’ हा फक्त चित्रपट नसून आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या उन्हाळ्या सुट्टीचा अनुभव जिवंत करणारा, रम्य ते बालपण असं सांगत, बालपणात रमविणारा एक निखळ प्रवास आहे.'' 

'एप्रिल मे ९९'मध्ये आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या १६ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Century : किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन
Mahebub Shaikh on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचे नाव गोरे आणि काम काळे, महेबूब शेख यांची टीका
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Century : किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
Mumbai News : प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
Embed widget