Sidhu Moosewala Murder Case : जुन्या जखमांवर ओरखडे; केवळ सिद्धूच नाही तर पंजाबमध्ये 'या' कलाकारांचीही झालीये हत्या
सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या हत्येच्या आधी देखील काही कलाकारांच्या पंजाबमध्ये हत्या करण्यात आल्या आहेत.
Sidhu Moosewala Murder Case : पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या हत्येमुळे पंजाब आणि मनोरंजनसृष्टी हदरली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या आधी देखील काही कलाकारांच्या पंजाबमध्ये हत्या करण्यात आल्या आहेत. पंजाबमधील गँगस्टर कल्चरनं पंजाब राज्यामधील लोकप्रिय कलाकारांवर हल्ला केला होता. या सर्व घटनांबाबत पंजाबी साहित्य सभेचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य जेसी परिंदा म्हणाले की, 'या दुर्दैवी घटनेने भूतकाळातील जुन्या जखमांवर ओरखडे ओढले आहेत. राज्यात गुंड संस्कृतीला आळा घालणं गरजेचे आहे.'
पंजाबमधील कलाकारांच्या हत्या
1988 मध्ये क्रांतिकारी कवी अवतार सिंह संधू यांची पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील तलवंडीच्या सलेम या गावामध्ये काही आतंकवाद्यांनी त्यांची हत्या केली. तसेच 27 वर्षाचे प्रसिद्ध गायक मर सिंह चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत सिंह यांची 8 मार्च 1988 रोजी हत्या करण्यात आली. पंजाबमधील मेहसामपूर येथे अमर सिंह चमकीला हे परफॉर्म करण्यासाठी चालले होते. त्यावेळी त्यांच्यावर काही लोकांनी गोळ्या झाडल्या. अभिनेता वीरेंद्र सिंह यांना लुधियानामध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गोळी झाडून ठार मारण्यात आले. तसेच पंजाबी गायक दिलशाद अख्तर यांची 1996 मध्ये गुरदासपुर गावामध्ये सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात हत्या करण्यात आली.
सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिद्धू मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कपिल शर्माने (Kapil Sharma) ट्वीट करत लिहिले आहे,"सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात येणे हे खूप धक्कादायक आणि दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो". हिमांशी खुराणानेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. शहनाज गिल, भगवंत मान आणि करण कुंद्रा या कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या
- पंजाबमधील आप सरकारने काल सुरक्षा काढून घेतली, आज काँग्रेस नेते आणि गायक सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या
- सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट तिहार जेलमध्येच रचला, दिल्ली पोलिसांच्या हाती लागली महत्वपूर्ण माहिती
- Sidhu Moosewala Murder : सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कोणी केली? गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी