Avdhoot Gupte : मराठी गायकावर कोसळला दु:खाचा डोंगर, अवधूत गुप्तेच्या आईचं निधन
Avdhoot Gupte : मराठी दिग्दर्शक, गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या आईच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
Avdhoot Gupte Mother Death: दिग्दर्शक, गायक,संगीतकार म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेल्या अवधूत गुप्तेवर (Avdhoot Gupte) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवधूतच्या आई मृदगंधा गुप्ते यांचे निधन झाले आहे. मृदगंधा गुप्ते यांच्या मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. पण उपचार यशस्वी न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अवधूतच्या आईवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज म्हणजेच सोमवार 10 जून रोजी बोरीवली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान मागेही एकदा अवधूतने त्याच्या आईच्या उपचारांविषयी भाष्य केलं होतं. पण त्यावेळी त्यांनी त्या उपचारांना प्रतिसाद दिला असून ते यशस्वी झाल्याचंही त्याने म्हटलं होतं.
अवधूतने काय म्हटलं होतं?
एका मुलाखतीमध्ये अवधूतने त्याच्या आईच्या आजारपणाविषयी भाष्य केलं होतं. त्यावर त्याने म्हटलं होतं की, 'थोडा का आमच्यासाठी त्रासदायक होता, पण शेवटी आम्ही जिंकलो. माझ्या आईला चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात मिळालेल्या उपचारांचा खूप फायदा झाला. तिला फुफ्फुसातील फायब्रोसिसचा त्रास होता. ही एक दुर्मिळ स्थिती असून त्यासाठी विशेष उपचारांची अवश्यकता असते. पण या उपचारांमुळे तिला खूप बरं वाटतंय.'
दरम्यान आता सुरु असलेल्या उपचारांना यश न आल्याने अवधूतच्या आईने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान अवधूत कायमच त्याच्या आईविषयी भरभरुन बोलायचा. त्याने म्हटलं की, 'आई मला नेहमी सांगायची की, आपल्या सभोवतालच्या लोकांशी प्रेमाने वागत राहा. त्यासाठी तिने काही गोष्टींचा आग्रह देखील धरला होता.' अवधूत कायमच त्याच्या आईविषयी भरभरुन बोलायचा. त्यामुळे आईबद्दलच्या त्याच्या भावना या सर्वांनाच माहित होत्या. दरम्यान त्याच्या आईने त्याच्या प्रत्येक कामाचं देखील कौतुक केलं होतं. त्याविषयी देखील अवधूतने बोलताना म्हटलं होतं की, 'मी रिऍलिटी शोचं जज करताना कोणत्याही स्पर्धकावर टीका करण्यापेक्षा कायमच त्यांना प्रोत्साहन देत आलोय. त्यामुळे त्यांनाही कायमच सोयीचं वाटतं. मी एक अशी व्यक्ती आहे की, जिला एकही शत्रू नाही आणि हे सगळं तिच्यामुळेच आहे.'
View this post on Instagram