एक्स्प्लोर

Atul Parchure Death : मराठी रंगभूमीवरचा हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड, अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

Atul Parchure Death : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Atul Parchure Death :  मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आलेली आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक,सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. 

मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. इतकच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचं अनेकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. इतकच नव्हे तर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासही सज्ज झाले होते. 

जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर

अभिनेते जयवंत वाडकर यांना ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी म्हटलं की,सूर्याची पिल्ले नाटाकाची तालीम सुरु होती.. पाच दिवसांपूर्वी त्याला पुन्हा त्रास होत होता म्हणून अॅडमिट करण्यात आलं. पण तो पुन्हा येईल असं वाटलं होतं. यावर काय बोलावं हेच सुचत नाहीये. नववीत असल्यापासून आम्ही एकत्र काम करतोय. तेव्हापासूनची आमची मैत्री होती. आमचा मित्र खूप लवकर गेलाय.

ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही : अशोक सराफ

ही अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. एक चांगला अभिनेता मराठी सिनेसृष्टीने गमावला आहे. ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही. असं व्हायला नको होतं. फार छान नट, फार छान मुलगा होता. माझा अत्यंत जवळचा आणि आवडता मित्र होता. एका सिनेमात त्याने माझं लहानपण केलं होतं आणि हे मी विसरुच शकत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी एबीपी माझाला दिली आहे. 

अतुल परचुरे हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होते. पण या सगळ्यावर मात करत पुन्हा एकदा रंगभूमीवर एक दमदार प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी सुर्याची पिल्ले या नाटकाची निवडही केली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. पण आता अतुल परचुरे यांनी जगाचा निरोप घेतला असून एक हरहुन्नरी कलाकार मराठी सिनेसृष्टीने गमावला असल्याची भावना प्रत्येकाची आहे. 

ही बातमी वाचा : 

Gunaratna Sadavarte : मोठी बातमी : मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वाची सुनावणी, तुम्ही बिग बॉसमध्ये जाऊन बसलात? हायकोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना सुनावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चाEknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवलीDevendra Fadnavis Full PC :पवार - ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच पत्रकार परिषद गाजवलीMahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget