तुम्ही कसल्या धमक्या देताय? आम्ही इथं येणार, तुम्ही सांगणारे कोण? कश्मीर चलो म्हणत अतुल कुलकर्णी थेट पहलगाममध्ये
Atul Kulkarni : आमचं काश्मीर, आमचा देश, तुम्ही कसल्या धमक्या देताय? आम्ही इथं येणार, तुम्ही सांगणारे कोण? कश्मीर चलें म्हणत अतुल कुलकर्णी थेट पहलगाममध्ये

Atul Kulkarni : काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीत अभिनेते अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाला फटका बसलाय. या हल्ल्यामुळे लोक त्यांची नियोजित ट्रीप सोडून परतत आहेत. अशावेळी चला काश्मीरला आपल्याला दहशतवाद्यांना पराभूत करायचं, असं अतुल कुलकर्णी यांनी म्हटलंय.
#ChaloKashmir #Feet_in_Kashmir #Kashmiriyat #love_compassion #DefeatTerror pic.twitter.com/nOe7zG8FWj
— atul kulkarni (@atul_kulkarni) April 27, 2025
काश्मीर आमचा आहे, तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नका : अतुल कुलकर्णी
अतुल कुलकर्णी म्हणाले, पर्वा मी पुण्याहून मुंबईला येत होतो. त्यावेळी मला वाटलं की, या हल्ल्यामागील उद्देश काय आहे? पहिल्यांदा असं पर्यटकांना मारलं गेलं. पर्यटकांनी काश्मीरमध्ये येऊ नये, हा यांचा उद्देश आहे. हा संदेश आहे. मला वाटतं उत्तर हेच आहे की, तुम्ही कोण सांगणार आम्हाला इथे येऊ नको म्हणून? काश्मीर आमचा आहे. आमचा देश आहे. तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही येणार आहोत. हा संदेश मोठ्या संख्येने दिला.
दोन-तीन वर्षांपासून रेकॉर्डब्रेक पर्यटक या ठिकाणी आले : अतुल कुलकर्णी
पुढे बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षांपासून रेकॉर्डब्रेक पर्यटक या ठिकाणी आले आहेत. मी इथे आल्यापासून स्थानिक नेत्यांशी बोलतोय. ही समस्या जर मिटवायची असेल तर माणसांनी एकत्र येणं फार गरजेचं असतं. पैशांच्याही पलिकडे हे खूप महत्त्वाचं आहे. हे आत्ता काश्मीरमध्ये सुरु झालं होतं. त्यामुळे मला वाटलं हा संदेश आपण छोट्या प्रमाणात का होईना? पोहोचू शकू का? हेच आपलं उत्तर असणार आहे. तुम्ही स्वत: या आणि पाहा. मला स्वत:ला अनेक अनुभव आलेले आहेत. सध्याही येतोय...इथली माणसं फार दु:खी आहेत..आपण इथे आलो तर त्यांना आनंद होणार आहे.
Mumbai to Srinagar, Kashmir.
— atul kulkarni (@atul_kulkarni) April 27, 2025
Crew said these ran FULL.
We need to fill them again.
चलिए जी कश्मीर चलें
हमको यहाँ आना है
आतंक को हराना है #ChaloKashmir #Feet_in_Kashmir #Kashmiriyat #love_compassion #DefeatTerror pic.twitter.com/XXLOBNiGwZ
इतर महत्त्वाच्या बातम्या
सोशल मीडिया इनफ्लूएन्सरला चुकीचा स्पर्श, जाग्यावर तरुणाच्या कानाखाली आवाज काढला!
























