(Source: ECI | ABP NEWS)
सोशल मीडिया इनफ्लूएन्सरला चुकीचा स्पर्श, जाग्यावर तरुणाच्या कानाखाली आवाज काढला!
Social Media influencer : सोशल मीडिया इनफ्लूएन्सरला चुकीचा स्पर्श, मुलीने जाग्यावर कानाखाली आवाज काढला!

Social media influencer : एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या मुलीने त्या मुलीच्या कानशिलात लगावली आहे. प्रसंग घडताच त्या मुलीने कोणतीही भीती न बाळगता संबंधित मुलाला कानशिलात लगावली. तिच्या या ठाम आणि धाडसी प्रतिसादाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
View this post on Instagram
रील स्टारने चुकीचा स्पर्श करणाऱ्या मुलाच्या कानशिलात लगावली
दरम्यान, ही रील स्टार व्हिडीओ शूट करत असताना मुलगा तिथे आला आणि त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलाय. यानंतर लगेच तिने प्रत्युत्तर दिलंय. या घटनेचा व्हिडीओ संबंधित रील स्टारने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय.
View this post on Instagram
छेड काढणाऱ्या घरच्यांनी त्याची मेंटल हेल्थ ठीक नसल्याचं म्हटलंय
याबाबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणाली, मी आमच्या बिल्डिंगमध्ये माझा स्नॅप व्हिडीओ शूट करत होते, त्यावेळी हा मुलगा अशा प्रकारचं कृत्य करुन गेलाय. आम्ही व्हिडीओ प्रुफ घेऊन त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याची मेंटल हेल्थ ठीक नसल्याचं म्हटलंय. त्याची मेंटल हेल्थ ठीक नाही, तर काहीही करणार का? कोणत्या अँगलने याची मेंटल हेल्थ खराब दिसत आहे. लोक कपड्यांवरुन जज करतात. मी यावेळी योग्य तो पेहराव केला होता, तरीही असं कृत्य केलंय. हे योग्य आहे का? कपड्यांवरुन मुलींना जज करणाऱ्या लोकांचा धिक्कार असो..मी साडी नेसली असती किंवा कुर्ता घातला असता तरीही 10 हजार टक्के हेच घडलं असतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























