संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
Raju Shinde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16 नोव्हेंबरला छ. संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजीनगरमधील नव्या भाजप कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

Raju Shinde Joins BJP: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेले राजू शिंदे यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 16 नोव्हेंबरला छ. संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16 नोव्हेंबरला छ. संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजीनगरमधील नव्या भाजप कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी, राजू शिंदे यांची भाजपात पुन्हा एकदा घरवापसी होणार आहे.
राजू शिंदेंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश
दरम्यान, 2024 साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शिंदेंनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. संभाजीनगर पश्चिममधून त्यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात निवडणूक देखील लढवली होती. जवळपास 1 लाखांहून अधिक मतं त्यांनी घेतली होती. राजू शिंदे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत केल्याचा आरोप करत ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, राजू शिंदे यांना शिवसेनेकडून देखील गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु होता.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का
दुसरीकडे, गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसला होता. माजी उपमहापौर असलेल्या राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदे यांनी भाजपच्या विविध पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना त्यात यश आले नव्हतं. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांनीही त्यावेळी राजू शिंदे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. मात्र, राजू शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि अखेर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या

























