Attack On Rapper Rahul Fazilpuria: 'अरे लड़की ब्यूटीफुल, कर गयी चुल' फेम गायकावर अंदाधुंद गोळीबार; आता प्रकृती कशी?
Attack On Rapper Rahul Fazilpuria: प्रसिद्ध रॅपर राहुल फाजिलपुरियावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. दैव बलवत्त म्हणून यामध्ये गायक सुखरुप बचावल्याची माहिती मिळत आहे.

Attack On Rapper Rahul Fazilpuria: गुरुग्राममध्ये (Gurugram) हरयाणवी गायक (Haryanvi Singer) आणि रॅपर राहुल फाजिलपुरिया (Rapper Rahul Fazilpuria) याच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. गुरुग्रामच्या सेक्टर 71 मध्ये गायक त्याच्या फॉर्च्युनर कारमधून सोसायटीतून बाहेर पडत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे टाटा हॅरियर कारमधून आले आणि राहुल फाजिलपुरिया याच्या गाडीवर दोन राऊंड अंदाधूंद गोळीबार करून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
रॅपर राहुल फाजिलपुरिया (Rahul Fazilpuria) याच्या गाडीवर झालेल्या गोळीबारात राहुल फाजिलपुरिया थोडक्यात बचावला. सुदैवाची बाब म्हणजे, सध्या कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. काही काळापूर्वी गायकाची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली होती, त्यानंतर ही घटना घडली.
प्रसिद्ध रॅपर आणि एल्विश यादवचा मित्र राहुल फाजिलपुरियावर अंदाधुंद गोळीबार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे, पण या घटनेत राहुल थोडक्यात बचावला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. गुरुग्रामजवळील बादशाहपूर एसपीआर (सदर्न पेरिफेरल रोड) इथे हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना अज्ञात गुन्हेगारांनी घडवून आणली आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
यापूर्वी सापाचं विष आणि शुटिंगसाठी सापांचा वापर केल्याच्या प्रकरणात एल्विश यादवसोबत त्याचं नाव पुढे आलं होतं. तो युट्यूबर एल्विशचा मित्र आहे. ईडीनं राहुलचीही चौकशी केली होती आणि त्याची मालमत्ता जप्त केली होती.
कोण आहे रॅपर राहुल फाजिलपुरिया?
राहुल हा रॅपर आणि गायक आहे. हरियाणवी गाण्यांमुळे त्याला चांगली ओळख मिळवून दिली आणि त्यानं बॉलिवूड चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. 'कपूर अँड सन्स' चित्रपटातील हिट झालेलं 'अरे लड़की ब्यूटीफुल, कर गयी चुल...' या गाण्यानं त्याला खूप ओळख मिळाली. हे गाणं सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्टवर चित्रित करण्यात आलं होतं. राहुलचं खरं नाव राहुल यादव आहे. फाजिलपुरिया हे त्यानं त्याच्या गावाच्या फाजिलपूरवरून ठेवलेलं नाव आहे. राहुल गुरुग्राममधील फाजिलपूर झारसा येथील रहिवासी आहे आणि राहुलनं दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाच्या तिकिटावर गुरुग्राममधून निवडणूक लढवली होती, पण त्याचा पराभव झालेला. तसेच, फाजिलपुरिया इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























