R. Madhavan On Marathi Hindi Language Raw : 'मी कोल्हापुरात शिकलोय, भाषेमुळे मला अडचण...'; मराठी-हिंदी भाषा वादावर काय म्हणाला आर. माधवन?
R. Madhavan On Marathi Hindi Language Raw : अनेक मराठी अभिनेते, राजकीय नेत्यांसह काही बॉलिवूड सेलिब्रिटीही यावर व्यक्त झालेल्या. अशातच आता मराठी हिंदी भाषेच्या वादावर अभिनेता आर. माधवननं वक्तव्य केलं आहे.

R. Madhavan On Marathi Hindi Language Raw : राज्य सरकारनं (Maharashtra Government) हिंदी सक्तीचा जीआर काढल्यानंतर मोठा वाद उफाळून आला. केंद्राच्या त्रिभाषा धोरणाअंतर्गत राज्य सरकारनं महाराष्ट्रातही (Maharashtra) मराठी (Marathi Language) आणि इंग्रजीसह तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचे निर्देश दिले, तसा जीआर मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला. पण, राज्यभरातून याला कडाडून विरोध करण्यात आला. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या. अनेक मराठी अभिनेते, राजकीय नेत्यांसह काही बॉलिवूड सेलिब्रिटीही यावर व्यक्त झालेल्या. अशातच आता मराठी हिंदी भाषेच्या वादावर अभिनेता आर. माधवननं (Bollywood Actor R. Madhavan) वक्तव्य केलं आहे.
अभिनेता आर. माधवन (R. Madhavan) सध्या त्याच्या आगामी 'आप जैसा कोई' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो फातिमा सना शेखच्या प्रेमात आहे. हा चित्रपट 11 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला, जो पाहिल्यानंतर सर्वजण अभिनेत्याचं कौतुक करत आहेत. तसेच, हिंदी-मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आर. माधवननं आपलं मत व्यक्त केलं. भारतातील भाषेमुळे त्याला कधीही कोणतीही समस्या आली नाही, असं अभिनेत्यानं सांगितलं आहे.
View this post on Instagram
"भाषा कधीच अडचण ठरली नाही!" : आर. माधवन
IANS शी बोलताना आर. माधवनने त्याच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीच्या अनुभवांमुळे त्याचं जीवन कसं बदललं, हे सांगितलं. सध्याच्या भाषिक आणि प्रादेशिक मतभेदांबद्दल विचारल्यावर त्याबाबत बोलताना आर. माधवन म्हणाला की, "मला कधीच असा अनुभव आला नाही... मी तमिळ बोलतो, मी हिंदी बोलतो, आणि मी कोल्हापुरातही शिक्षण घेतलंय. मी मराठी देखील शिकलोय. त्यामुळे भाषेमुळे मला कधीच अडचण आली नाही. ती मला येत असल्यामुळे नाही आणि ती मला येत नसल्यामुळेही नाही..."
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजीसह तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा आदेश दिला होता. देशाच्या त्रिभाषा धोरणाअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलेलं , ज्याचा उद्देश मुलांना शाळेत तीन भाषा शिकवणं असल्याचं नमूद करण्यात आलेलं. पण, या त्रिभाषा सुत्राआडून हिंदीची सक्ती करण्याचा हेतू असल्याचा आरोप सरकारवर करण्यात आला आणि चारही बाजूंनी सरकारला घेरलं गेलं, यामध्ये प्रामुख्यानं शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या दोन राजकीय पक्षांनी पुढाकार घेतलेला. दोन्ही पक्षांनी त्रिभाषा धोरण म्हणजे, याला मराठी अस्मितेवर हल्ला असल्याचं म्हटलं, त्यानंतर या मुद्द्यावरुन प्रचंड मोठा गदारोळ झआला, अखेर राज्य सरकारनं हा जीआर मागे घेतला. त्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. या मेळाव्यासाठी मराठी माणसांची प्रचंड मोठी गर्दी उसळली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























