Ashok Saraf Awarded Padma Shri By President Murmu: अशोक सराफांंनी राष्ट्रपतींकडून पद्मश्री पुरस्कार स्वीकारला 'तो' क्षण; मराठी रसिकांचा ऊर अभिमानानं भरुन आला....
Ashok Saraf Awarded Padma Shri By President Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सध्या अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार स्विकारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ashok Saraf Awarded Padma Shri By President Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांना पद्म पुरस्कार (Padma Awards) प्रदान करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते, विनोदवीर आणि अवघ्या महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा (Ashok MaMa) म्हणजेच, अशोक सराफ (Ashok Saraf) यांनाही पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सध्या अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार स्विकारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो क्षण पाहून अवघ्या महाराष्ट्राची मान गर्वानं उंचावली आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. "पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या", असं अशोक सराफ म्हणाले आहेत.
View this post on Instagram
पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांना अभिवादन केलं. अशोक मामांच्या याच साधेपणानं साऱ्यांची मनं जिंकून घेतलीत. अख्खा महाराष्ट्रानं अशोक सराफांच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मराठीतील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत अगदी दिमाखात समाविष्ट होणारं नाव म्हणजे, अशोक सराफ. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही अशोक सराफ यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. एवढंच काय तर, अशोक सराफांनी दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच'सारख्या मालिकेतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे मराठी सुपरस्टार म्हणून अशोक सराफांना ओळखलं जातं.
'जानकी' या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी 'आयत्या घरात घरोबा','अशी ही बनवाबनवी','बाळाचे बाप ब्रह्मचारी','भूताचा भाऊ','धुमधडाका'सह 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























