Ashi Hi Banwa Banwi : मार्केट मध्ये आली आहे सत्तर रुपयांची नवीन नोट; नेमकं प्रकरण काय?
Ashi Hi Banwa Banwi : मार्केट मध्ये आली आहे सत्तर रुपयांची नवीन नोट; नेमकं प्रकरण काय?

Ashi Hi Banwa Banwi : अशी ही बनवा बनवी (Ashi Hi Banwa Banwi) या सिनेमाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाहीये. अशातच या सिनेमाला प्रमोट करण्यासाठी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf),अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे फोटो वापरुन 70 रुपयांची नोट बनवण्यात आली आहे. सचिन पिळगावकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
सचिन पिळगावकर त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, 70 रुपयांची नवीन नोट बाजारात आली आहे. प्रवाह पिक्चरवरील "अशी ही बनवा बनवी" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून 1 लाख नोटा वाटण्यात आल्या आणि मुंबई आणि पुण्यात, स्टार प्रवाहच्या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर 70 रुपयांच्या नवीन नोटेबद्दल पोस्ट केली आणि चित्रपटाच्या प्रीमियरचा प्रचार केला.
अशी ही बनवाबनवी हा सिनेमा आज पाहायला मिळणार
प्रवाह पिक्चर प्रीमियर असणार आहे. अशी ही बनवाबनवी हा सिनेमा दिनांक 1 मे ला दुपारी 1 वाजता आणि रात्री 8 वाजता
फक्त आपल्या प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे.
अशी ही बनवा बनवी हा 1988 साली प्रदर्शित झालेला एक अत्यंत लोकप्रिय आणि विनोदी मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले होते. चित्रपटाची कथा चार तरुण मित्रांच्या भोवती फिरते – धनंजय, अनंत, परश्या आणि सुधीर. या चौघांचं स्वप्न असतं मुंबईत आपलं घर आणि यशस्वी करिअर मिळवण्याचं. मात्र त्यांच्या आर्थिक अडचणी, नोकरीचे अभाव आणि समाजातील विसंगती यांमुळे ते अनेक मजेदार आणि गोंधळात टाकणाऱ्या प्रसंगांमध्ये अडकतात. नोकरी मिळवण्यासाठी आणि घर मिळवण्यासाठी ते खोटं बोलतात. पुरुष असूनही स्त्री असल्याचं दाखवलतात. त्यातून निर्माण होतो एक विनोदी गोंधळ.
सुधीरच्या भूमिकेत अशोक सराफ, परश्याच्या भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे, अनंतच्या भूमिकेत सचिन पिळगावकर आहेत. सर्वांनी यांनी कमालीचा अभिनय केला आहे. त्यांची टाइमिंग, संवादफेक आणि केमिस्ट्रीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. आजही या सिनेमाला तितकाच प्रतिसाद मिळतोय. 'अशी ही बनवा बनवी' मधील संवाद, विनोदी प्रसंग आणि पात्रं आजही लोक स्मितहास्याने आठवतात. 'हसत-हसत पोट दुखेपर्यंत हसवणारा' असा हा चित्रपट आज अनेक मराठी घरांमध्ये वारंवार पाहिला जातो. तो केवळ मनोरंजन करत नाही तर त्यातून मैत्री, संघर्ष आणि आशावादाचंही सुंदर चित्रण पाहायला मिळतं.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
'..अन् शरद पवारांनी 'तो' प्रश्न अवघ्या 10 सेकंदात सोडवला', अभिनेते परेश रावल यांनी सांगितला किस्सा























