एक्स्प्लोर

भाभी गुस्सा हैं... अनुष्कानं विराट कोहलीकडे दुर्लक्ष केलं? Viral व्हिडीओनंतर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा पाऊस

Anushka Sharma Virat Kohli: अनुष्कानं विराटला का बरं इग्नोर केलं असेल? व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस.

Anushka Sharma Virat Kohli: अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media Viral) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री गाडीतून खाली उतरताना दिसतेय. त्यावेळी विराट तिच्यासाठी स्वतःचा हात पुढे करतो, पण अनुष्का विराटला इग्नोर करते, त्याची जराही मदत न घेताच गाडीतून खाली उतरते. दोघेही रेस्टॉरंटमध्ये जातात. हा व्हिडीओ बंगळुरूचा आहे, असं सांगितलं जातंय. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच, युजर्सनी विराट कोहलीला घेरलंय. विराटनं अवनीत कौरचा फोटो लाईक केल्यामुळेच असं घडतंय, असं युजर्स म्हणत आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विराट कोहलीनं अभिनेत्री अवनीत कौरचा फोटो लाईक केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर विराट कोहलीनं एक इन्स्टा पोस्ट करत त्यावर फीड क्लिअर करत असताना इन्स्टा अल्गोरिदममुळे झालं असावं असं स्पष्टीकरण दिलेलं. या प्रकरणानंतर विराट आणि अनुष्का एकत्र स्पॉट झाल्यामुळे त्यांच्यावर साऱ्यांच्याच नजरा खिळलेल्या. त्यात अनुष्कानं विराटला इग्नोर केल्यामुळे पुन्हा एकदा विराट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. 

हा व्हिडीओ समोर येताच युजर्सनी विराट कोहलीला चांगलंच घेरलं आहे. एका युजरनं लिहिलंय की, "असं दिसतंय की, फोटोच्या लाईकनंतर अनुष्का चांगलीच रागावली आहे." पुढे एका युजरनं लिहिलंय की, "बिचारा विराट", तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "अब भाभी चिकू भैया को अल्गोरिथम समजाएगी", अजून एका युजरनं लिहिलंय की, "अवनीत कौरच्या लाईकनंतर वहिनी रागावली." तर, कमेंट करताना अनेक युजर्सनी अनुष्काची बाजू घेतली आहे आणि म्हटलंय की, फक्त 5 सेकंदांच्या क्लिपमुळे युजर्स अनुष्काला काय-काय बोलत आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

विराटनं केलेली अवनीतची पोस्ट लाईक 

विराट कोहलीनं अलिकडेच अभिनेत्री अवनीत कौरची एक पोस्ट लाईक केलेली. दरम्यान, काही वेळानं विराटनं लाईक काढून टाकला. विराट कोहलीच्या लाईकचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विराटचा अक्षरशः बाजार उठवला. 

त्यानंतर विराटनं हे स्पष्ट केलं की, "फीड क्लिअर करताना असं दिसतं की, इन्स्टाग्राम अल्गोरिदमनं चुकून अॅक्टिविटी ट्रॅक केली. यामागे माझा कोणताही हेतू नव्हता. मी तुम्हाला विनंती करतो की, कृपया कोणत्याही अनावश्यक अफवा पसरवू नका. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'युद्ध म्हणजे Propaganda', अभिनेत्री स्वरा भास्करने शेअर केला जॉर्ज ओरवेलचा कोट, म्हणाली,..'मूर्खपणाचा अंत..'

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget