एक्स्प्लोर

Ankita Walawalkar On Suraj Chavan: 'सोशल मीडियावर गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या...'; अंकिता वालावलकरनं सांगितलं 'झापुक झुपूक'ला कमी प्रतिसाद मिळण्याचं कारण

Ankita Walawalkar On Suraj Chavan: रिलीजनंतर तीन दिवसांत सूरजचा सिनेमा 1 कोटींची कमाईसुद्धा करू शकला नाही. सूरजचा 'झापूक झुपूक' प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहणं टाळल्याचं चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन तरी दिसतंय.

Ankita Walawalkar On Suraj Chavan Zhapuk Zhupuk Movie: बिग बॉस मराठीच्या (Big Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता, सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) नुकताच 'झापूक झुपूक' (Zhapuk Zhupuk Marathi Cinema) सिनेमा रिलीज झाला. ज्यावेळी सूरजनं बिग बॉसची ट्रॉफी उंचावली, त्यावेळी त्याच मंचावर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सूरजसोबत सिनेमा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार, सूरज चव्हाण आणि इतर दिग्गज मराठी कलाकारांसह (Marathi Actor) केदार शिंदेंनी झापुक झुपूक सिनेमा रिलीज केला. पण, जेवढं प्रेम महाराष्ट्रानं बिग बॉसमधल्या सूरजला दिलं, तेवढं प्रेम झापुक झुपूकमधल्या सूरजला दिलं नसल्याचं दिसतंय. कारण सूरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक' सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. 

रिलीजनंतर तीन दिवसांत सूरजचा सिनेमा 1 कोटींची कमाईसुद्धा करू शकला नाही. सूरजचा 'झापूक झुपूक' प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहणं टाळल्याचं चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन (Zhapuk Zhupuk Box Office Collection) तरी दिसतंय. 'झापूक झुपूक' सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही इन्स्टावर पोस्ट शेअर करत भाष्य केलं आहे. तसेच, एका लाईव्ह सेशनमध्ये बोलताना त्यांनी अनेकांनी सूरजच्या सिनेमाचे ठरवून नकारात्मक रिव्यू दिल्याचंही सांगितलं होतं. अशातच, आता बिग बॉसच्या घरात सूरजसोबत असणारी स्पर्धक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Konkan Hearted Girl Ankita Walawalkar) हिनं यासंदर्भात इन्स्टावर एक पोस्ट केली आहे. 

सूरजच्या 'झापूक झुपूक'बद्दल काय म्हणाली अंकिता वालावलकर? 

अंकिता वालावलकरनं इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय की, "सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट मी आतापर्यंत 3-4 वेळा बघितला. खरंतर, मी आता सोशल मीडियावर गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छिते की, सूरज फक्त गरीब आहे म्हणून आज त्या जागेवर नाहीये, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा मुलगा, त्याने जे काम केलंय ना ते खरोखर कौतुकास पात्र आहे. त्याच्याकडून एखादी गोष्ट करून घेण्यात जास्त मेहनत आहे हे मला माहीत आहे. कारण, 70 दिवस 24 तास एकत्र राहिलोय... तुम्ही तर एडिटेड 'बिग बॉस' बघितलाय. जेव्हा 'बिग बॉस'ने दिलेल्या निकषांच्या आधारावर मी सूरजला बाद करत होते तेव्हा मला जज केलं गेलं. पण, उद्देश तोच होता की त्याने त्याच्या गोष्टी सुधाराव्यात त्याला कळणं गरजेचं होतं की तो कुठे मागे पडतोय. त्यामुळे त्याच्याकडून चित्रपटासाठी आउटपुट काढून घेणाऱ्या केदार सरांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खूप कौतुक...."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

"मी आधी पण बोलले होते की इंडस्ट्रीमध्ये इफ्लुएन्सर क्रिएटर आणि अभिनेते यांच्या मध्ये एक दरी आहेच पण, कलाकाराला जसं जात धर्म नसतो, तसंच त्याला हे प्रेम सहानुभूती पूर्वक मिळाले असं म्हणू पाहणाऱ्यांनी त्याचं कलाकार म्हणून काम पण पहावं. सिनेमा पाहून त्यावर भाष्य करा, न पाहता टीका करू नका. या चित्रपटाला प्रतिसाद कमी मिळाला तर त्याचं हे ही कारण आहे की सूरजचे फॅन्स गावाकडे आहेत आणि गावांमध्ये चित्रपटगृह नाहीत, काहींचं म्हणणं होतं की त्याला ग्रुम करून चित्रपट बनवला पाहिजे होता पण तशी इच्छा सूरजची पण हवी ना? म्हणून सूरज चव्हाण हे Character आहे तसंच Present केलं गेलंय... त्याने जे काम केलंय त्यावर आपण भाष्य करूया. त्या मुलाने या चित्रपटात क्षमतेपेक्षा सुंदर काम केलंय... आपण चित्रपटांकडे चित्रपट म्हणूनच बघायला शिकूया! जर महाराष्ट्रानेच सूरजला जिंकवलंय तर महाराष्ट्र हा चित्रपट डोक्यावर घेईलच..." आख्याना" माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!" असं अंकिता वालावकरनं इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण बिग बॉसच्या पाचव्या पर्वात एकत्र स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात अंकितानं सूरजचा नॉमिनेट केलं होतं, त्यावरुन तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं होतं. अशातच आता अंकितानं सूरजला पाठिंबा देणारी पोस्ट केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Zapuk Zupuk Box Office Collection Day 3: वाटलं एक अन् घडलं भलतंच, सूरज चव्हाणची क्रेझ असूनही फिका पडला 'झापुक झुपूक'; किती कमावले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Ganesh Naik: गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
Tamilnadu Election: निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
Narhari Zirwal Bribe case: मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
BMC Meeting: किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर

व्हिडीओ

Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर
Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Ganesh Naik: गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
Tamilnadu Election: निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
Narhari Zirwal Bribe case: मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
BMC Meeting: किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
T20 World Cup 2026 Points Table : टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत
टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत
Nashik Container Loot Case : 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, चोरी झालीच नसल्याचं पोलीस तपासात उघड, नेमकं काय होतं प्रकरण?
400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, चोरी झालीच नसल्याचं पोलीस तपासात उघड, नेमकं काय होतं प्रकरण?
Gopichand Padalkar and Ajit Pawar: अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
Ind vs Pak T20 World Cup 2026 : भारताच्या विजयाचा धसका; मोहसीन नक्वीची गुपचूप एक्झिट; तोंड लपवून स्टेडियममधून काढला पळ, नेमकं काय घडलं?
भारताच्या विजयाचा धसका; मोहसीन नक्वीची गुपचूप एक्झिट; तोंड लपवून स्टेडियममधून काढला पळ, नेमकं काय घडलं?
Embed widget