एक्स्प्लोर

Zapuk Zupuk Box Office Collection Day 3: वाटलं एक अन् घडलं भलतंच, सूरज चव्हाणची क्रेझ असूनही फिका पडला 'झापुक झुपूक'; किती कमावले?

Zapuk Zupuk Box Office Collection day 3: बिग बॉस मराठीमुळे सूरजचा मिळालेली प्रसिद्ध आणि अवघ्या महाराष्ट्रानं त्याच्यावर केलेला प्रेमाचा वर्षाव पाहिला तर, सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट रिलीज होताच, बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करेल असंच एकंदरीत चित्र होतं. पण, घडलं उलटच.

Zapuk Zupuk Box Office Collection day 3: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता गोलिगत स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavhan) सध्या त्याच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी सूरजचा सिनेमा 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) रिलीज झाला. जिओ स्टुडिओजनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर, केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. सूरजनं ज्यावेळी 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी उंचावली, त्याचवेळी दिग्दर्शक केदार शिंदेंनी, त्याच मंचावर सूरजच्या आगामी सिनेमाची घोषणा केली होती. आता तब्बल वर्षभराच्या आतच सूरजचा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे.  'झापुक झुपूक' सिनेमाचा (Zapuk Zupuk Movie) टीझर आणि ट्रेलर आल्यानंतर प्रेक्षकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला होता. पण, प्रत्यक्षता सिनेमा रिलीज झाल्यानंतर मात्र, चित्र काहीसं वेगळंच पाहायला मिळत आहे. 

बिग बॉस मराठीमुळे सूरजचा मिळालेली प्रसिद्ध आणि अवघ्या महाराष्ट्रानं त्याच्यावर केलेला प्रेमाचा वर्षाव पाहिला तर, सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट रिलीज होताच, बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करेल असंच एकंदरीत चित्र होतं. मात्र, चित्रपट रिलीज झाला आणि अगदी उलट चित्र पाहायला मिळालं. आपल्या प्रेमाचा वर्षाव करून सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील त्याच्या फॅन्सनी सिनेमाकडे मात्र पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय. सूरजचा सिनेमाचं पहिल्या तीन दिवसांचं कलेक्शन पाहून तरी असंच दिसतंय. 

'झापुक झुपूक'चं पहिल्या तीन दिवसांचं कलेक्शन किती? 

केदार शिंदे दिग्दर्शित आणि सूरज चव्हाण अभिनीत 'झापुक झुपूक' सिनेमा गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी रिलीज करण्यात आला खरा, मात्र बंपर ओपनिंग करणार असं वाटणाऱ्या 'झापुक झुपूक'ची ओपनिंग फारच संथ झाली. त्यानंतर वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत वाढ होईल, असं वाटलं होतं. पण, एकंदरीत कलेक्शनवरुन मात्र तसं दिसत नाही. चित्रपटाची तीन दिवसांची कमाई एक कोटींहूनही कमीच आहे. 'झापुक झुपूक'चं पहिल्या तीन दिवसांचं कलेक्शन फक्त आणि फक्त काही लाखांमध्येच आहे. 

दिवस  कलेक्शन 
पहिला दिवस  24 लाख 
दुसरा दिवस  24 लाख 
तिसरा दिवस  19 लाख 
एकूण 67 लाख 

इंडस्ट्रीतील सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन ट्रॅक करणाऱ्या सॅकनिल्कनं दिलेल्या आकडेवारीनुसार, 'झापुक झुपूक'नं भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयांचं कलेक्शन केलं. दुसऱ्या दिवशीसुद्धा 24 लाखांचीच कमाई केली. तर, रविवारी म्हणजेच, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच्या पहिल्या विकेंडला फक्त आणि फक्त 19 लाखांची कमाई केली. 

'झापुक झुपूक'च्या पहिल्या तीन दिवसांच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर, आधीच्या दोन्ही दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी 'झापुक झुपूक'च्या कमाईत कमालीची घट झाली. सिनेमाची पहिल्या तीन दिवसांची कमाई फक्त 67 लाख रुपयेच आहे. दरम्यान, वरील आकडेवारी सॅकनिल्कनं दिलेल्या आकडेवारीवरुन देत आहोत. या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतात. 'झापुक झुपूक' सिनेमाच्या टीमनं अद्याप सिनेमाच्या कलेक्शनची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sara Arjun As Madhubala: कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम
कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम
Picture Boys Trailer: Bigg Boss नंतर ‘छोटा पुढारी’ची मोठ्या पडद्यावरची एन्ट्री चर्चेत; कॉमेडीचा ओव्हरडोस घेऊन येतोय नवा सिनेमा, 'पिक्चर बॉईज'चा ट्रेलर पाहिलात?
Bigg Boss नंतर ‘छोटा पुढारी’ची मोठ्या पडद्यावरची एन्ट्री चर्चेत; कॉमेडीचा ओव्हरडोस घेऊन येतोय नवा सिनेमा, 'पिक्चर बॉईज'चा ट्रेलर पाहिलात ?
Mia Khalifa on israel attack on lebanon: इस्रायलने लेबनॉनवर मिसाईल डागलं, 250 जणांचा जीव गेला, Adult Star मिया खलिफाला रडू कोसळलं, म्हणाली..
इस्रायलने लेबनॉनवर मिसाईल डागलं, 250 जणांचा जीव गेला, Adult Star मिया खलिफाला रडू कोसळलं, म्हणाली..
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...
'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Embed widget