Ankita Walawalkar Accident: लग्नाच्या धामधुमीत अंकिता वालावलकरच्या गाडीचा अपघात! नवरी मंडपात जाण्याआधीच लागली नजर, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
Ankita Walawalkar Accident: खुद्द अंकिता वालावकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे. अंकिता वालावलकर काल रात्री 1 च्या सुमारास बाहेर गेली होती. तेव्हा तिच्या कारचा अपघात झाला आहे.

Ankita Walawalkar Accident: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या घरी सध्या लग्नाची चांगलीच गडबड सुरु आहे. अंकिता वालावलकर कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अंकिताच्या घरी लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अंकिताची मेंहदी आणि साखरपुडा काल पार पडला. दरम्यान, अशातच काल अंकिताच्या कारचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे(Ankita Walawalkar Accident). खुद्द अंकिता वालावकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे. अंकिता वालावलकर काल रात्री 1 च्या सुमारास बाहेर गेली होती. तेव्हा तिच्या कारचा अपघात झाला आहे. कारच्या आरसा पूर्णपणे फुटल्याचे दिसत आहे. परंतु यात अंकिता कोणालाही कसलीही दुखापत झाली नसल्याचेही तिने सांगितले आहे. सुदैवाने सर्व काही ठीक असल्याचे तिने सांगितलं आहे.
अंकिताने तिच्या सोशल मिडियावरती अपघाताचा आणि कारचा पूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये कारचा बाजूचा आरसा फुटलेला दिसत आहे. तर खाली कारला देखील स्क्रॅच पडल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर अकिंताने आम्ही सुरक्षित आहोत, परंतु नजर लागते हे खरं आहे, असं कॅप्शन दिलं आहे. ऐन लग्नाच्या धामधुमीत तिच्या कारचा अपघात झाला आहे. या घटनेने तिचे चाहते तिच्या काळजीत आहेत.
अंकिता वालावलकरचा काल झाला साखरपुडा
अंकिता वालावलकरचा (Ankita Walwalkar) काल साखरपुडा संपन्न झाला. कोकणातील देवबाग येथील घरीच त्यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. कुणाल भगतसोबत अंकिता वालावलकर लग्नबंधनात अडकणार आहे. उद्या 16 फेब्रुवारी रोजी देवबागमध्येच त्यांचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. अंकिताने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिता वालावलकरने हिरवी काठापदराची साडी, भरजरी दागिने असा लूक केला आहे. तर कुणालने पांढरा कुर्ता त्यावर जॅकेट या लूकमध्ये आला. दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. अगदी साध्या पद्धतीने त्यांचा साखरपुडा झाला. चाहते त्यांना त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडियावर केला शेअर
अंकिताने कार अपघाताचा पूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात कारचा बाजूचा आरसा फुटलेला दिसत आहे. तर खाली कारला देखील स्क्रॅच पडल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर अकिंताने आम्ही सुरक्षित आहोत परंतु नजर लागते हे खरं आहे, असं कॅप्शन तिने दिलं आहे. ऐन लग्नाच्या धामधुमीत तिच्या कारचा अपघात झाला आहे. त्यामुळे चाहत्यांनी काळजी व्यक्त केली.
View this post on Instagram























