एक्स्प्लोर

Anant Ambani Radhika Merchant : अनंत-राधिकाची लगीनघाई; किती कोटींची मालकीण आहे अंबानींची होणारी नवी सून?

Anant-Radhika Net Worth : रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी हे राधिका मर्चंटसोबत विवाहबद्ध होणार आहेत.

Anant-Radhika Net Worth :  देशातील आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) हे राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) विवाहबद्ध होणार आहेत. काही दिवसांपूर्वी या जोडप्याच्या लग्नाचे आमंत्रण व्हायरल झाले होते. 1 ते 8 मार्च या दरम्यान अनंत-राधिकाच्या विवाहाचे प्री-वेडिंग कार्यक्रम रंगणार आहेत. अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांच्याकडे किती संपत्ती आहे, याची चर्चा रंगू लागली आहे. 

अनंत अंबानीची संपत्ती किती?

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. त्यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. यानंतर अनंत  मुंबईत परतले आणि वडिलांच्या मार्गदर्शनात  रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करू लागले. 'डीएनए'च्या रिपोर्टनुसार अनंत अंबानींची एकूण संपत्ती 3,44,000 कोटी रुपये आहे.

राधिका मर्चंटचे शिक्षण किती?

राधिका मर्चंट यादेखील संपत्तीच्या बाबतीच्या होणारा नवरा अनंत अंबानीपेक्षा काही कमी नाही. राधिका या प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. त्यांचा जन्म गुजरातमधील कच्छ येथे झाला. राधिका मर्चंट यांनी 'कॅथेड्रल अँड जॉन कॉनन'आणि मुंबईतील  इकोले मोंडियाल वर्ल्ड येथून आपले शिक्षण पूर्ण केले. न्यूयॉर्क विद्यापीठातून त्यांनी राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली.

राधिका मर्चंट यांची संपत्ती किती?

राधिका मर्चंटने तिचे पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मायदेशी परतली. राधिका मर्चंट या रिअल इस्टेट फर्ममध्ये काम करत आहे. राधिकाच्या एकूण संपत्तीबाबत कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका मर्चंटकडे 8 ते 10 कोटी रुपयांची संपत्ती आहे. राधिकाचे वडील वीरेन मर्चंट हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. GQ नुसार त्यांची एकूण संपत्ती 755 कोटी रुपये आहे. राधिका मर्चंटला नृत्याची खूप आवड आहे. ती एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना आहे. जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटर बीकेसीमध्ये त्याने पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्मेन्स सादर केला होता.

राधिका-अनंत यांचा साखरपुडा मागील वर्षी अँटिलियामध्ये पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड स्टार्ससह अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. सध्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. 

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जबरदस्त परफॉर्मन्स देणार असल्याच्या बातम्या आहेत. त्याशिवाय इतर सेलिब्रेटीदेखील परफॉर्मेन्स सादर करणार असल्याचे म्हटले जात आहे. या विवाहसोहळ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजकही सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget