एक्स्प्लोर

Amruta Khanvilkar Vajale Ki Bara Song: ''वाजले की बारा'साठी मी पहिली पसंती नव्हते...'; अमृता खानविलकरचा खुलासा, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

Amruta Khanvilkar Vajale Ki Bara Song: अमृताच्या करिअरला खरा टर्निंग पॉईंट 'वाजले की बारा' या लावणीमुळे मिळाला. 'नटरंग' सिनेमातली ही लावणी खूपच गाजली आणि याच गाण्यामुळे अमृता घराघरांत पोहोचली. 

Amruta Khanvilkar Vajale Ki Bara Song: मराठीसोबतच (Marathi Film Industry) हिंदी सिनेसृष्टीचा (Hindi Films) पडदा गाजवलेली अभिनेत्री अमृता खानविलकर (Actress Amruta Khanvilkar) म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. आपल्या दमदार अभिनयासोबतच आकर्षक व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट नृत्यकौशल्य आणि ग्लॅमरस अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. मराठी चित्रपट, हिंदी सिनेमे, वेब सीरिज (Web Series) आणि रिअॅलिटी शो अशा विविध माध्यमांतून अमृतानं आपली छाप उमटवली आहे. नुकताच तिनं आपला साड्यांचा ब्रँड काढला असून ती आता अभिनेत्रीसोबत एक बिजनेसवुमनसुद्धा आहे. सध्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या अमृताच्या करिअरला खरा टर्निंग पॉईंट 'वाजले की बारा' या लावणीमुळे मिळाला. 'नटरंग' सिनेमातली (Natarang Movie) ही लावणी खूपच गाजली आणि याच गाण्यामुळे अमृता घराघरांत पोहोचली. 

अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिनं अनेक मुलाखतींमध्ये 'वाजले की बारा' लावणीचा (Vajale Ki Bara Lavani) अनुभव सांगितलाय. पण, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृता खानविलकरनं तिच्या 'वाजले की बारा' लावणीबाबत एक किस्सा शेअर केलाय.  

नुकत्याच झालेल्या 'फिल्मफेअर मराठी राउंड टेबल' (Filmfare Marathi Round Table) चर्चासत्रात प्रिया बापट, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या चौघींनी हजेरी लावली होती. या मुलाखतीत बोलताना अमृता खानविलकरनं खुलासा केलाय की, 'वाजले की बारा' या गाजलेल्या लावणीसाठी ती पहिली पसंती कधीच नव्हती. अमृतानं केलेला खुलासा ऐकून अनेकांना धक्काच बसलाय. तसेच, सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. जर,  'वाजले की बारा'मध्ये अमृता खानविलकर दिसणार नव्हती, मग कोण दिसणार होतं? असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by A M U L Y A by Amruta (@amulyabyamruta)

अमृता खानविलकर नेमकं काय म्हणाली? (Amruta Khanvilkar On Vajale Ki Bara Lavani)

अमृता मुलाखतीत बोलताना म्हणाली की, "सुरुवातीला वाजले की बारा या गाण्यासाठी दुसऱ्या अभिनेत्रीला या गाण्यासाठी घेण्यात आलं होतं. पण, शेवटच्या क्षणी त्या अभिनेत्रीनं गाण्यातून माघार घेतली. शुटिंगच्या एक दिवस आधीच मला या गाण्यासाठी रवी जाधव यांचा कॉल आला. तेव्हा माझ्यासाठी लावणी हा प्रकार पुर्णपणे नवीन होता. या गाण्यासाठी एक्स्प्रेशन, एनर्जी आणि पारंपारिक बॉडी लँग्वेजची गरज असते. तेव्हा सुरुवातीला मी खुप नर्वस होते. पण रवी जाधव यांनी विश्वास दाखवत "अमृता तू हे करू शकते...", असं म्हणत प्रोत्साहन दिलं. नंतर मी या गाण्याला होकार दिला..."

"तेव्हा मी हे गाणं पूर्ण ताकदीनं सादर केलं. हे गाणं रिलीज होताच शहरापासून ग्रामीण भागापर्यंत माझी लोकप्रियता झपाट्यानं वाढली. आता सुद्धा अनेक जण मला माझ्या नावाऐवजी 'वाजले की बारा वाली' म्हणून ओळखतात. 'वाजले का बारा या गाण्याला होकार देणं माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट निर्णय होता. या गाण्यानंतरच माझ्या डान्स स्किल्सची चर्चा सुरू झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात परफॉर्मन्ससाठी ऑफर मिळू लागल्या...", असं अमृता खानविलकरनं सांगितलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एग्झिट; पोस्ट करत म्हणाली, 'निरोप घेतेय...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget