एक्स्प्लोर

Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एग्झिट; पोस्ट करत म्हणाली, 'निरोप घेतेय...'

Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वा गोखले हिनं मालिकेत किमयाची भूमिका साकारलेली. किमयाच्या येण्यामुळे स्वानंदीला समरवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते.

Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'वीण दोघांची ही तुटेना' (Veen Doghantali Hi Tutena) या मालिकेत एक नवं रंजक वळण आलेलं. मालिकेत समरची मैत्रीण 'किमया' आल्यामुळे कथानकात मोठी उलथापालथ झालेली. प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वा गोखले (Poorva Gokhale) हिनं मालिकेत किमयाची भूमिका साकारलेली. किमयाच्या येण्यामुळे स्वानंदीला समरवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते. एका पार्टीत दारू पिऊन स्वानंदी समरसमोर तिच्या मनातील भावना, प्रेम भडाभडा बोलून टाकते. पण, इथेही ट्वीस्ट आहेच. समरला वाटतं स्वानंदी दारू प्यायलीय, त्यामुळे बडबडतेय आणि तो तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. पण, आता या मालिकेत मोठा ट्वीस्ट घेऊन आलेली किमया मालिकेतून एग्झिट घेणार आहे. आताच कुठे एन्ट्री घेतलेली अभिनेत्री लगेचच एग्झिट घेत असल्यामुळे चाहते कोड्यात पडले आहेत. 

प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वा गोखले (Poorva Gokhale) हिनं 'वीण दोघांची ही तुटेना' मालिकेत एन्ट्री घेतली आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. या निमित्तानं प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा झी मराठीच्या कुटुंबात परतली. किमया हे  केवळ एक नवं पात्र नसून ती  समरची जुनी मैत्रीण आणि त्याची Ex- गर्लफ्रेंड. परदेशातून भारतात परतल्यानंतर ती थेट समरच्या घरी राहायला येते, ज्यामुळे घरातील वातावरण आणि नात्यांची समीकरणे पूर्णपणे बदलून जातात. पण, आता हीच किमया मालिकेतून एग्झिट घेणार आहे. स्वतः पूर्वा गोखले हिनं याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे.  

पूर्वा गोखले हिनं तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट करत तिनं आपण मालिकेतून एग्झिट घेत असल्याचं सांगितलं आहे. खरंतर पूर्वाची मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून एन्ट्री झालेली. त्यामुळे काहीच एपिसोडसाठी आलेली किमया आता मालिकेतून एग्झिट घेणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या सेटवर केक कापून सेलिब्रेशन सुद्धा करण्यात आलंय. यावेळी पूर्वाला संपूर्ण मालिकेच्या टीमनं शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पूर्वानं तिच्या पोस्टमध्ये सेटवरचे काही न पाहिलेले फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by poorva gokhale (@poorvagokhale)

पूर्वा गोखलेनं इन्स्टा पोस्टमध्ये काय लिहिलंय? 

पूर्वा गोखलेनं इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय की, "किमया ही वादळासारखी येऊन मालिकेचा एक भाग झाली. या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ही भूमिका पाहुण्या कलाकाराची असल्यामुळे 15 दिवसांतच मी या मालिकेतून निरोप घेतेय... माझ्यावर सगळ्यांनी खूप प्रेम केलंय, मला आपलंसं केलं... मी सर्वांचे आभार मानते आणि तुम्हा सर्वांची मी ऋणी आहे..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Devdatta Nage Ghabadkund Look: डोळ्यांत अंगार अन् चेहऱ्यावर रहस्यमयी भाव; 'खंडोबा' साकारणाऱ्या देवदत्त नागेच्या नव्या लूकनं वाढवली उत्सुकता PHOTO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget