Actress Death : नैराश्येला वैतागून अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, अमृता पांडेने राहत्या घरीच संपवलं आयुष्य
Actress Death : अभिनेत्रीने नैराश्येला वैतागून टोकाचं पाऊल उचललं. तिने राहत्या घरीच तिच्या आयुष्याचा शेवट केला.
Amrita Pandey Death : भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे (Amrita Pandey) हीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नैराश्येला वैतागून अमृताने आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. तिचा मृतदेह भागलपूरमध्ये सापडला. अमृता ही आदमपूर येथील दिव्या धाम येथील तिच्या राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. अमृता ही तिच्या बहिणीच्या लग्नासाठी तिच्या नवऱ्यासोबत गेली होती. लग्नानंतर तिचा पती पुन्हा मुंबईला परतला आणि अमृता तिथेच थांबली. त्यावेळी तिने टोकाचा निर्णय घेतला आहे.
तिने घेतलाल्या या टोकाच्या निर्णयामुळे भोजपुरी सिनेसृष्टीला देखील मोठा धक्का बसलाय. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत म्हणून घोषित करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
अमृताने का घेतला आत्महत्येचा निर्णय?
पोलिसांनी तपासादरम्यान तिच्या वस्तूंची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी तिचा फोन जप्त केला. त्यावेळी असं लक्षात आलं की, अमृताने गळफास घेण्याआधी तिच्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं होतं. सकाळी 10.15 वाजता तिने तिच्या व्हॉट्सअॅपवर हे स्टेटस ठेवलं होतं. , 'दोन बोटींवर त्याचं आयुष्य अवलंबून का होतं? आम्ही एक बोट बुडवून त्याचं आयुष्य सोप्पं केलं,' असं स्टेटस तिने तिच्या व्हॉट्सअॅपवर ठेवलं होतं.
नैराश्येतून आत्महत्या केल्याचं समोर
मागील अनेक दिवसांपासून अमृता ही नैराश्येचा सामना करत असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. तिच्या कुटुंबियांनी देखील पोलिसांना अशी माहिती दिली. पण नुकतच अमृता ही तिच्या प्रतिशोध या वेबसीरिजमध्येही झळकणार होती. तिची ही वेब सीरिज हॉरर होती. पण त्याचदरम्यान अमृता ही डीप्रेशनवरही उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीये. पण तिने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्या मृत्यूबाबत काही प्रमाणात संशय देखील व्यक्त केला जातोय. सध्या पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.
ସନ୍ଦିଗ୍ଧ ଅବସ୍ଥାରେ ମିଳିଲା ଅଭିନେତ୍ରୀଙ୍କ ମୃତଦେହ #ActressDead #AmrutaPandey #BhojpuriActresshttps://t.co/LeEdZ093jR
— Odisha Reporter (@OdishaReporter) April 28, 2024