एक्स्प्लोर

Sher Shivraj New Poster :  ‘जावळीच्या जंगलाचा राजा एकच...!’, ‘शेर शिवराज’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Sher Shivraj : नुकतेच ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Sher Shivraj : शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली, असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय 22 एप्रिलला रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतेच ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या पोस्टरमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) ‘छत्रपती शिवाजी महाराजां’च्या लूकमध्ये दिसत आहे. जावळीच्या गर्द झाडीत शत्रूला चकवा देण्याची त्यांची योजना या पोस्टरमध्ये दिसत आहे.

पाहा पोस्टर :

‘जावळीच्या जंगलाचा राजा एकच... तो म्हणजे, सह्याद्रीचा वाघ ‘छत्रपती शिवाजी महाराज!’ असं खास कॅप्शन देत लेख-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हे पोस्टर शेअर केले आहे.

‘या’ दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

त्या काळी विजापूरच्या दरबारात 'मै लाऊंगा शिवाजी को...! जिंदा या मुर्दा!', अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या साथीनं लेखक, दिग्दर्शक, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर 'शेर शिवराज' चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 22 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काय आहे कथानक?

‘शेर शिवराज' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटात घडणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithvi Shaw Sapna Gill Case : पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
Stock Market Crash : स्टॉक मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला, निफ्टी 50 आपटला, गुंतवणूकदार सैरभैर
शेअर मार्केटमध्ये ब्लॅक फ्रायडे, सेन्सेक्स कोसळला, निफ्टी गडगडला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Afghanistan v Australia : जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Bus Depo Reality Check : एसटी डेपोंची 'रिअ‍ॅलिटी', 'माझाचा' चेकSpecial Report Prashant Koratkar | इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कुठे?Special Report Swarget Case :स्वारगेटच्या नराधमाचं राजकीय कनेक्शन,आजी-माजी आमदारांचे आरोप-प्रत्यारोपSpecial Report Thane Marathi GR : मराठी भाषा दिनी मराठीचीच गळचेपी,  मनसे संतप्त, महापालिकेवर मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithvi Shaw Sapna Gill Case : पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
Stock Market Crash : स्टॉक मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला, निफ्टी 50 आपटला, गुंतवणूकदार सैरभैर
शेअर मार्केटमध्ये ब्लॅक फ्रायडे, सेन्सेक्स कोसळला, निफ्टी गडगडला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Afghanistan v Australia : जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
Earthquake : अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
प्रशांत कोरटकरांचा फोन 25 तारखेपासून बंद, तीन पथकांकडून तपास सुरु, अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु, गोपनीय सूत्रांची माहिती
देवदर्शन-पर्यटन करत प्रशांत कोरटकरांची हुलकावणी, अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरु, गोपनीय सूत्रांची माहिती
... अशा घटना घडत असतात, कारवाई चालू असते, संजय सावकारे यांचं धक्कादायक वक्तव्य, योगेश कदमांचं 'ते' वक्तव्य ही वादात
..अशा घटना घडत असतात, कारवाई चालू असते, संजय सावकारे यांचं धक्कादायक वक्तव्य, योगेश कदमांचं 'ते' वक्तव्य ही वादात
Embed widget