एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

जॉन अब्राहमने सुरु केले ‘तेहरान’चे शूटिंग, चित्रपटाचा टीझर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता जॉनने त्याचा आगामी नवीन चित्रपट 'तेहरान'चे शूटिंग सुरू केले आहे. मॅडॉक फिल्म्स अंतर्गत बनणाऱ्या ‘तेहरान’ या चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. नुकताच याचा टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जॉन खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन करत आहेत.

‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहने चाहत्यांसोबत शेअर केली लेकाची पहिली झलक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री,  ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया नुकतेच आई-बाबा झाले असून सध्या ते त्यांच्या लाडक्या लेकासोबत म्हणजेच 'लक्ष्य' सोबत वेळ घालवत आहेत. मुलाबाबतचे सर्व अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता भारती आणि हर्षने लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

'मी पुन्हा येईन' वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज

महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेबसीरिज येणार आहे.

'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज

'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे थिरकताना दिसत आहेत. 

'स्वयंवर मिका दी वोटी'मध्ये मिकाच्या एक्स गर्लफ्रेंडची वाइल्ड कार्ड एन्ट्री

लोकप्रिय गायक मिका सिंहचा 'स्वयंवर मिका दी वोटी' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या होत्या. स्वयंवरात सहभागी झालेल्या मुली मिकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असताना आता या कार्यक्रमात मिकाची एक्स गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

'रोडीज 18'चा महाअंतिम सोहळा पार; इतिहासात पहिल्यांदाच दोन स्पर्धक ठरले विजेते

'रोडीज 18' या लोकप्रिय अॅडव्हेंचर कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. आशीश भाटिया आणि नंदिनी 'रोडीज 18' चे विजेते ठरले आहे. सोनू सूदने हा लोकप्रिय कार्यक्रम होस्ट केला आहे. 

टाईमपास-3 मधील ‘लव्हेबल’ गाणं रिलीज

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास 3' येत्या 29 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दगडूचे वेड लावणारे प्रेम याआधी आपण सर्वांनीच पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या ‘लव्हेबल’ भावना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 'टाइमपास 3' मधील ‘लव्हेबल’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रथमेश परब आणि हृतावर चित्रित करण्यात आले आहे. 

'ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत, काळजी नसावी'; अपघातानंतर मंगेश देसाईंची पहिली सोशल मीडिया पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा काल (10 जुलै) अपघात झाला होता. मंगेश देसाई हे कुटुंबासोबत कर्जत येथे जात होते. यावेळी  वाशी, कोकण भवन परिसरात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने मंगेश देसाई आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघातात मंगेश यांच्या गाडीचे नुकसान झाले. अपघातानंतर मंगेश यांनी सोशल मीडियावर  एक पोस्ट शेअर केली आहे. 

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’च्या शिरपेचात मानाचा तुरा, दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्डने चित्रपटाचा सन्मान!

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम चित्रपटाला लाभल्यानंतर आता चित्रपटाचा पुरस्कारांनीही गौरव होऊ लागला असून, दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे.

'थोर लव्ह अॅन्ड थंडर' प्रेक्षकांच्या पसंतीस; भारतात केली रेकॉर्डब्रेक कमाई

हॉलिवूडचा सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा नुकताच जगभरात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच विकेंडला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतात या सिनेमाने अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांना मागे टाकलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget