एक्स्प्लोर

Dhaakad, Bhool Bhulaiyaa 2 Online Leaked : बॉलिवूडला पुन्हा एकदा पायरसीचा फटका! रिलीजच्या अवघ्या काही तासांतच ‘धाकड’, ‘भूलभुलैया 2’ लीक!

Dhaakad, Bhool Bhulaiyaa 2 Online Leaked : कार्तिक आर्यन-कियारा अडवाणीचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’, आणि कंगना रनौतचा चित्रपट 'धाकड'च्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे.

Dhaakad, Bhool Bhulaiyaa 2 Online Leaked : बॉलिवूडचे दोन बिग बजेट चित्रपट शुक्रवारी (20 मे) रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) आणि कार्तिकी आर्यन (Kartik Aryan), कियारा अडवाणीचा (Kiara Advani) 'भूल भुलैया 2' हे द्नही बहुचर्चित चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे दोन्ही चित्रपटांचे निर्माते चांगलेच खूश आहेत. पण, आता निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. रिलीजच्या काही तासांनंतर दोन्ही चित्रपट ऑनलाईन लीक झाले आहेत.

कार्तिक आर्यन-कियारा अडवाणीचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’, आणि कंगना रनौतचा चित्रपट 'धाकड'च्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच हे चित्रपट ऑनलाईन लीक झाले आहेत. पायरेटेड साईट्सवरूनही लोकांनी ते डाऊनलोड करायला देखील सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही, तर नुकतेच रिलीज झालेले ‘जयेशभाई जोरदार’, ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हे चित्रपट देखील ऑनलाईन पायरसीचे बळी ठरले आहेत.

पायरसीचा मोठा फटका

मीडिया रिपोर्टनुसार, ‘भूल भुलैया 2’ आणि ‘धाकड’ हे चित्रपट ‘तमिळरॉकर्स’ आणि ‘मूवीरूल्झ’सारख्या साईटवरून एचडीमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पायरसी हा असा एक धोका आहे, ज्याचा सामना चित्रपट उद्योग दीर्घकाळापासून करत आहे. पायरसीमुळे अनेक बड्या चित्रपटांना आर्थिक फटका बसला आहे. आता या मोठ्या चित्रपटांच्या लीकमुळे देखील बरेच नुकसान होणार असल्याचे लक्षात येत आहे.

कंगनाचा ‘धाकड' चर्चेत!

‘पंगा’ क्वीन’ कंगना रनौत हिचा 'धाकड' हा चित्रपट एक बॉलिवूड अॅक्शन ड्रामा आहे, ज्याचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे. या चित्रपटात कंगना रनौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात कंगना ‘रॉ एजंट’ची भूमिका साकारत आहे. अभिनेता अर्जुन रामपाल देखील या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

'भूल भुलैया 2'साठीही प्रेक्षक उत्साहित

'भूल भुलैया 2' हा प्रियदर्शन दिग्दर्शित 2007मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल आहे. अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘भूल भुलैया 2’मध्ये कार्तिक आर्यन, तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा 15 वर्षांनंतर परतणाऱ्या मोंजोलिकाच्या भोवती फिरते, ज्याचा सामना कार्तिक आर्यनने केला आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 19 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Jr NTR : ज्युनियर एनटीआरच्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा! धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Embed widget