एक्स्प्लोर

Dharmaveer 2 : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर-2 ची घोषणा? मंगेश देसाई म्हणाले, 'असं सगळं घडणार...'

Dharmaveer 2 : धर्मवीर 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 

Dharmaveer 2 :  शिवसेनेचे ज्येष्ठ दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची देखील घोषणा झाली. पहिल्या भाग प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला अभूतपूर्व अशी कलाटणी मिळाली. त्यामुळे हा सिनेमा त्याचसाठी बनवण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर आता दुसऱ्या भागाची घोषणा केल्यानंतर, विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Legislative Assembly) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे त्याचसाठी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. 

सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी नुकतच या सगळ्यावर भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर 2 या सिनेमाची घोषणा करण्यात आल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यावरच मंगेश देसाई यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. त्यांनी या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

मंगेश देसाईंनी काय म्हटलं? 

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सिनेमाची घोषणा केली का? या प्रश्नाचं उत्तर देताना मंगेश देसाई यांनी म्हटलं की, 'असं पहिल्या भागावेळी देखील असंच बोललं गेलं. असं सगळं घडणार होतं, म्हणून धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे भाग 1 आणण्यात आला होता. पण असं काहीच नाहीये. पहिला भागही मागच्या वेळी 22 एप्रिल रोजी आणण्यात आला होता. काम पूर्ण झालं नव्हतं म्हणून तो पुढे ढकलला. माझ्या लोकांनी सांगितलेल्या किस्स्यांचं 72 तासांचं रेकॉर्डिंग आहे. आता त्या एका सिनेमात कसं दाखवायचं. म्हणून तेव्हाच आमचं दुसरा भाग काढायचं हे ठरलं. त्यासाठी माझी आणि प्रवीणची  चर्चा देखील झाली की दुसरा भाग करावाच लागेल. पहिल्या भागाचं 4.30 तासांचं शुटींग झालं होतं. त्यातलं तीन तासाचं तुम्ही पाहिलंत उरलेल्या दीड तासाचं करणार काय? त्या दीड तासांमध्ये बरचे चांगले किस्से आहेत जे प्रेक्षकांसमोर यायलाच हवे. '

पुढे त्यांनी म्हटलं की, त्याचवेळी आमचं ठरलं की, 'भाग दोनही शूट करायचा. एका पुरस्कार सोहळ्यावेळी प्रवीण मला म्हणाला की मंगेश दुसऱ्या भागाची रुपरेषा तयार झाली आहे आणि पहिल्या भागातल्या बऱ्याच गोष्टी आपण वापरु शकतो. त्यावेळी मी प्रवीणला म्हटलं की, ती तुला जर ते योग्य वाटत नसेल, म्हणजे तुला असं वाटत असेल की त्या सीनसाठीच आपण पार्ट 2 करतोय, तर मला ह्यात अजिबात रस नाही. ते सीन योग्यरित्या बसत असतील आणि तुझं स्क्रिप्ट असेल तरच ते आपण करुया. त्यामुळे दुसऱ्या भागाची तयारी तेव्हाच सुरु झाली होती.' 

ही बातमी वाचा : 

Shiva Marathi Serial : शिवाचे स्टंट काही केल्या थांबेना, अभिनेत्रीने खऱ्या आजारपणातून उठून आता सीनसाठी थेट सिलेंडरच उचलला

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget