एक्स्प्लोर

Amey Khopkar : मराठी अभिनेत्रींचा अपमान सहन करणार नाही, सुरेश धस यांनी प्राजक्ताची माफी मागावी; मनसे नेते अमेय खोपकरांची मागणी

Amey Khopkar : सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केल्यानंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.

Amey Khopkar :  आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी नुकतच अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) उल्लेख केल्याने एकच खळबळ माजली आहे. आमदार धस हे सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अभिनेत्रींचा उल्लेख केला. त्यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं. या प्रकारानंतर मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी धस यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट इशारा दिलाय. 

दरम्यान अमेय खोपकर यांनी एबीपी माझासोबत संवाद साधताना सुरेश धस यांनी प्राजक्ताची माफी मागायला हवी अशी मागणी केलीये. तसेच त्यांचं आणि प्राजक्ताचं बोलणं झालं तिला या संपूर्ण प्रकाराचा मोठा धक्का बसला असल्याचं अमेय खोपकरांनी म्हटलं आहे. अमेय खोपकर यांनी एक्स पोस्ट करतही सुरेश धस यांना इशारा दिलाय. यावर आता आमदार सुरेश धस काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.  

मी कोणत्याही कलाकाराचा अपमान सहन करणार नाही - अमेय खोपकर

एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना अमेय खोपकर यांनी म्हटलं की, या संदर्भात माझं इतकच म्हणणं आहे की, तुमचं जे काही घाणेरडं राजकारण आहे, ते तुम्हाला लखलाभो.. यामध्ये कुठल्याही प्रकारे मराठी कलाक्षेत्रात किंवा नाटकक्षेत्रातल्या अभिनेत्रींना ओढू नका. माझं प्राजक्तासोबत रितसर बोलणं झालंय. तिला खूप मोठा धक्का बसलाय.हास्यजत्रेच्या कार्यक्रमानिमित्त ते सगळेजण परळीला गेले होते, सत्कार सोहळा झाला होता. तेवढीच भेट झाली होती. त्यावेळी सत्कार करतानाचा फोटो काढून धन्यवाद साहेब असं म्हणून ट्विट केलं होतं. तेवढी झालेली आयुष्यभराची भेट, त्यावर हे लोक राजकारण करत असतील तर आम्ही तरी नाही खपवून घेणार. तुम्हाला तुमचं जे काही राजकारण करायचं असेल ते करा पण यामध्ये मराठी अभिनेत्रींना ओढू नका.मी मराठी कलाक्षेत्रातल्या कोणत्याही कलाकाराचा अपमान सहन करणार नाही.या सगळ्याचा निषेध व्हायला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ताबडतोब माफी देखील मागितली पाहिजे.

अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं... - अमेय खोपकर

अमेय खोपकर यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत.

ही बातमी वाचा : 

Suresh Dhas On Prajakta Mali: सुरेश धस यांच्या विधानानंतर प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; महिला आयोगात करणार तक्रार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
Rohini  Khadse on Chitra Wagh : चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
Prashant Koratkar : 'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात, पण स्थानिक यंत्रणेची मदत नाहीच! 19 मार्चपर्यंत चंद्रपुरातील हॉटेलमध्ये मुक्काम
'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात, पण स्थानिक यंत्रणेची मदत नाहीच! 19 मार्चपर्यंत चंद्रपुरातील हॉटेलमध्ये मुक्काम
Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला दिवसाला धमकीचे 100 फोन, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
जय श्रीराम, उद्या तुझ्या घरी येतो अन्... शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChitra Wagh on Anil Parab :  माझ्या चारित्र्यावर किती वेळा बोलणार, आम्ही काय रस्त्यावर पडलो आहे का?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 22 मार्च 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
Rohini  Khadse on Chitra Wagh : चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
Prashant Koratkar : 'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात, पण स्थानिक यंत्रणेची मदत नाहीच! 19 मार्चपर्यंत चंद्रपुरातील हॉटेलमध्ये मुक्काम
'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात, पण स्थानिक यंत्रणेची मदत नाहीच! 19 मार्चपर्यंत चंद्रपुरातील हॉटेलमध्ये मुक्काम
Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला दिवसाला धमकीचे 100 फोन, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
जय श्रीराम, उद्या तुझ्या घरी येतो अन्... शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून धमकी
Sangli Accident : नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला, दोन कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी
नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला, दोन कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी
Share Market :  फक्त पाच दिवसांच्या तेजीनं चार वर्षांचं रेकॉर्ड मोडलं,  सेन्सेक्स, निफ्टीत तेजी, गुंतवणूकदार मालमाल
फक्त पाच दिवसांच्या तेजीनं चार वर्षांचं रेकॉर्ड मोडलं, सेन्सेक्स, निफ्टीत तेजी, गुंतवणूकदार मालमाल
Pandharpur Vitthal Mandir: लाखो विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित प्रकाशित 
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित, वादावर पडदा
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
Embed widget