Rapper Lil Tjay Shot : गायक-रॅपर लिल टीजेवर दरोडेखोरांकडून गोळीबार; गायक गंभीर जखमी
लिल टीजेला न्यू जर्सी (New Jersey) येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

Rapper Lil Tjay Shot : गायक-रॅपर लिल टीजेवर (Lil Tjay) 22 जून 2022 रोजी रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला. लिल टीजेवर दरोडेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये लिल टीजे हा गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर लिल टीजेला न्यू जर्सी (New Jersey) येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
टियोन जेडेन मेरिट उर्फ लिल टीजे हा अमेरिकेमधील प्रसिद्ध गायक आणि रॅपर आहे. TMZ ने बर्गन काउंटी प्रॉसिक्युटर ऑफिसच्या प्रेस रिलीझच्या माध्यमातून सांगितलं की लिल टीजे आणि त्याच्या एका मित्रावर लुटारूंनी गोळीबार केला. टीजेच्या मित्राला एक गोळी लागली तर लिल टीजे या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
TMZच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणी मोहम्मद कोनाटे याच्यासह दोघांना सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लिल टीजेची इमरजेंसी सर्जरी करण्यात आली आहे. लिल हा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. सिटी प्लेसच्या पश्चिमेला असलेल्या हडसन रिव्हर इंडस्ट्रियल साइटवर लिल टीजेवर हल्ला करण्यात आला. हा परिसर सहसा संध्याकाळच्या वेळी गजबजलेला असतो, परंतु रेस्टॉरंट्स आणि स्टोअर्स बंद झाल्यानंतर, तेथे खूप शांतता असते आणि तेव्हाच ही घटना घडली.
लिल टीजेचे इंस्टाग्रामवर सात मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचे कोलंबिया रेकॉर्ड्समध्ये दोन अल्बम आहेत. बिलबोर्डच्या 200 वरील टॉप-5 अल्बममध्ये या अल्बमचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे 6 लॅक कॉलिंग माय नेम गाण्यानं 2021 मध्ये बिलबोर्ड हॉट 100 वर तीसरा क्रमांक पटकावला. टीजे हा अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर आहे. त्यामुळे् त्याचा चाहता वर्ग मोठा आहे.
हेही वाचा:
- Shamshera Teaser: अंगावर शहारे आणणारा 'शमशेरा'चा टीझर रिलीज; संजय दत्त अन् रणबीर कपूरच्या लूकनं वेधलं लक्ष
- Shamshera Poster : 'शमशेरा' सिनेमातील रणबीर कपूरचा लूक आऊट; आलियाने शेअर केलं पोस्टर
- Shamshera: 'शुद्ध सिंह'; 'शमशेरा'मधील संजय दत्तचा दमदार लूक पाहिलात का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
