एक्स्प्लोर

Pushpa The Rise : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ‘या’ नव्या विक्रमाला गवसणी!

Pushpa The Rise Collection : बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

Pushpa The Rise : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाने रिलीज होऊन अनेक विक्रम केले आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, असे असूनही चित्रपटाची जादू अद्याप कमी होताना दिसत नाही. रिलीजसोबतच चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडत आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाने 9 आठवड्यातही तब्बल 1.39 कोटींची कमाई केली आहे.

या बक्कळ कमाईसह, ‘पुष्पा’ हा चित्रपट 9व्या आठवड्यात इतकी कमाई करणारा देशातील दुसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, विकी कौशलचा चित्रपट ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ 1.64 कोटी रुपयांसह पहिल्या स्थानावर होता. दरम्यान, ‘पुष्पा’नेही या यादीत आपले दुसरे स्थान निश्चित केले आहे.

चित्रपटाच्या या कलेक्शनबद्दलही सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे, कारण चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊनही थिएटरमध्ये ही कामगिरी केली आहे. मात्र, मंदगतीने सुरू झालेला ‘पुष्पा’चा या आठवड्यातील व्यवसाय येत्या आठवडाभरात आणखी कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाने कमी कालावधीत अनेक विक्रम केले आहेत. बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाने आधीच जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी आता चित्रपटगृहांनंतर OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर हा चित्रपट प्रदर्शित केला आहे.

‘पुष्पा’ चित्रपटाबद्दल सांगायचे, तर अल्लू अर्जुनचा हा ब्लॉकस्टर चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना आणि फहाद फासिलदेखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
Gautami patil on Kon Honar Crorepati: 'मी फक्त लावणी कलाकार नाही...'; गौतमी पाटीलची 'KBC'मध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर म्हणाली...
'मी फक्त लावणी कलाकार नाही...'; गौतमी पाटीलची 'KBC'मध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर म्हणाली...
Prahaar The untold Story OTT: राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
Maharashtra Epstein Files Teaser 3: एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?
एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतककऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतककऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Ram Purnekar and Eknath shinde: साहेब नाही, माझे वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
साहेब नाही, माझे वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
Embed widget