एक्स्प्लोर

Shraddha Kapoors Eetha: प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर

Shraddha Kapoors Eetha: 'ईठा' सिनेमाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? मोठी अपडेट समोर.

Eetha Movie Release Date: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या आपला आगामी सिनेमा 'ईठा'मुळे (Eetha) चर्चेत आहे.  'ईठा' सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून या सिनेमाची प्रचंड चर्चा होऊ लागली आहे. या सिनेमात कोण कोणते कलाकार झळकणार? हे अद्याप उघड झालेलं नाही.   माहितीनुसार, श्रद्धा कपूरने 'ईठा' या सिनेमात प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  दरम्यान, या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. फिल्ममेकर्सने या सिनेमाच्या ट्रेलर रिलीज डेटबाबत मोठी माहिती दिली आहे. 'ईठा' सिनेमाचा ट्रेलर नेमकं कधी रिलीज होणार? जाणून घेऊयात.

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाचा ट्रेलर याच आठवड्यात पण कोणत्या दिवशी रिलीज होणार? (Shraddha Kapoors Eetha Movie Trailer Release Date)

'ईठा' या सिनेमात श्रद्धा कपूरसह रणदीप हुड्डा यांची  मुख्य भूमिका आहे. श्रद्धा कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  तिने व्हिडीओ शेअर करत 'ईठा' या सिनेमाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, 'ईठा' या सिनेमाचा ट्रेलर या आठवड्याच्या शुक्रवारी रिलीज होणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी 'ईठा' या सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज होणार आहे. या व्हिडीमध्ये गावाचे दृश्य दिसत आहे. एका महिलेभोवती लोक जमलेले दिसत आहेत.   तसेच 'ईठा - ईठा'  या नावाचा जयघोष करत आहेत.  व्हिडीओतील वातावरण आणि  बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रेक्षकांमध्ये हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. सध्या श्रद्धा कपूरने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

'ईठा' या सिनेमाची रिलीज डेट  देखील समोर आली आहे. 'ईठा' हा चित्रपट  4 डिसेंबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.  सध्या प्रेक्षक 'ईठा' या सिनेमाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.  ट्रेलरमधून प्रेक्षकांना आणखी नवीन काय पाहायला मिळणार? कोणत्या नवीन कलाकारांची झलक पाहायला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  'ईठा' या सिनेमातून श्रद्धा कपूरचा कधी न पाहिलेलं रुप प्रेक्षकांना बघायला मिळत आहे,  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता आहे. श्रद्धा कपूरचे पात्र अशा एका स्त्रीची कथा सांगते, जे लोकांना प्रेरित करेल. Laxman Utekar दिग्दर्शित 'ईठा' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची नेमकी काय रिअॅक्शन असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Gautami patil on Kon Honar Crorepati: 'मी फक्त लावणी कलाकार नाही...'; गौतमी पाटीलची 'KBC'मध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर म्हणाली...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautami patil on Kon Honar Crorepati: 'मी फक्त लावणी कलाकार नाही...'; गौतमी पाटीलची 'KBC'मध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर म्हणाली...
'मी फक्त लावणी कलाकार नाही...'; गौतमी पाटीलची 'KBC'मध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर म्हणाली...
Prahaar The untold Story OTT: राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
Maharashtra Epstein Files Teaser 3: एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?
एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
Advertisement

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Ram Purnekar and Eknath shinde: साहेब नाही, माझी वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
साहेब नाही, माझी वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Embed widget