एक्स्प्लोर

Maharashtra Epstein Files Teaser 3: एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?

Maharashtra Epstein Files: 'त्याची गय केली जाणार नाही...'; 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' मध्ये सुबोध भावेंची एन्ट्री; चित्रपटाचा टीझर सोशल मीडियात व्हायरल.

Maharashtra Epstein Files Teaser: नाशिकचा भोंदू बाबा, अशोक खरात (Ashok Kharat) याचे प्रकरण उघड होताच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. या प्रकरणाच्या संबंधित अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाले.  स्वत:मध्ये अद्भुत शक्ती असल्याचं भासवत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले.  लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली. तसेच महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. या प्रकरणी काही राजकीय नेत्यांसोबत अशोक खरातचे काही फोटो समोर आले होते. या प्रकरणाचा भंडाफोड करण्यात आला. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या तुरुंगात आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेवर लवकरच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' (Maharashtra Epstein Files) असे चित्रपटाचे नाव असून, या सिनेमाच्या टीझरनेच (Maharashtra Epstein Files Movie Teaser) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. दरम्यान, या सिनेमाचा तिसरा टीझर रिलीज झाला असून, या सिनेमात दिग्गज अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांची भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'च्या तिसऱ्या टीझरची प्रचंड चर्चा होत आहे.

सुबोध भावेंची 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'मध्ये एन्ट्री, तिसरा टीझर सोशल मीडियात व्हायरल (Maharashtra Epstein Files Teaser 3 Release Actor Subodh Bhave)

'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' या बहुचर्चित सिनेमाचा बहुप्रतिक्षित तिसरा टीझर अखेर रिलीज झाला आहे.   या सिनेमाचे दोन टीझर आधी रिलीज झाले होते. या सिनेमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या सिनेमात अभिनेत्री आणि बिग बॉस फेम दिपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका आहे.  तसेच उदय टिकेकर यांचीही  या सिनेमात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या दोन्ही कलाकारांची झलक या सिनेमाच्या टीझरमधून स्पष्ट झाली. दरम्यान, आता 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' या सिनेमाचा तिसरा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या टीझरमध्ये सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'च्या तिसऱ्या टिझरमध्ये सुबोध भावेंची झलक पाहायला मिळत आहे. या टिझरमध्ये सुबोध भावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत दिसत असल्याची माहिती आहे. या टिझरमध्ये सुबोध भावे यांचा एक डायलॉग ऐकायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांसमोर सुबोध भावे म्हणतात की, 'मंत्री असो किंवा आमदार असो. आमच्या पक्षाचा असो किंवा दुसऱ्या पक्षाचा असो. जो कुणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत यायलाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हा सर्वांना', असं सुबोध भावे म्हणताना दिसत आहे. या सिनेमाचा टिझर सोशल मीडियात व्हायरल होत असून,   हा बहुप्रतिक्षित चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 

Swaroop B. Sawant दिग्दर्शित या चित्रपटात दिपाली सय्यद, उदय टिकेकर आणि सुबोध भावे यांची महत्त्वाची भूमिका आहे. आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत या सिनेमात आणखी कोणते कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार?  या सिनेमात अशोक खरात यांची भूमिका कोण साकारणार? हे अजूनही गुलदस्त्यात असून, हे लवकरच उघड होईल. 

अशोक खरात प्रकरणात अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले होते. या प्रकरणात अशोक खरातचा तपास करुन त्याला अटक करण्यात आली आहे. अशोक खरातने भोंदूगिरी,  बनावट रुद्राक्ष, मध विकून  तब्बल 47 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केला होती.  अशी माहिती ईडी तपासातून उघड झाली होती. दरम्यान,  या सिनेमातून आणखी कोणती माहिती उघड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Sachin Pilgaonkar Ashi Hi BanwaBanwi: 'मला ओळखलंत का सासूबाई?'; 'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकर साडी नेसून सुप्रिया पिळगावकरांच्या आईला भेटले, अन् मग...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
Makarand Anaspure on Nana Patekar: 'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा
'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा
Ashwini Gorle Trolled: 'अगं पैठणी साडीची पूर्ण वाट लावलीस...'; 'तारिणी' फेम अभिनेत्री झाली ट्रोल, पैठणी साडीचा ड्रेस घालणं पडलं महागात, नेटकरी संतापले
'अगं पैठणी साडीची पूर्ण वाट लावलीस...'; 'तारिणी' फेम अभिनेत्री झाली ट्रोल, पैठणी साडीचा ड्रेस घालणं पडलं महागात, नेटकरी संतापले
Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Advertisement

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget