एक्स्प्लोर

VIDEO : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; सर्वसामान्य आरोपीप्रमाणे मेडिकल टेस्टसाठी नेताना पुष्पाच्या फायरचा 'फ्लॉवर' झाला

Allu Arjun Arrested : हैद्राबादमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शो वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामध्ये अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Pushpa 2 Stampede Hyderabad :  साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली असून त्याची सरकारी रुग्णालयात त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आली. एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनची हैद्राबादच्या गांधी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्यावेळी रुग्णालयाच्या आवारात त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं. दरम्यान, अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतंय. 

हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलिस प्रशासनाना माहिती न देता उपस्थित लावली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली. अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आलं नाही. परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएरट मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला. 

अल्लू अर्जुनला न्यायालयीन कोठडी

अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पुष्पा फेम अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली. त्यानंतर त्याला हैद्राबादच्या गांधी रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी हजर करण्यात आलं. स्टारडम असलेल्या अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी तिथेही गर्दी झाली होती. अल्लू अर्जुनला पाहून त्यावेळीही चाहत्यांनी आरडाओरड सुरू केली.

एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. तसेच त्याला शासकीय रुग्णालयातही मेडिकल टेस्टसाठी नेण्यात आलं. 

अल्लू अर्जुनवर आरोप काय?

पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत केली. तसेच दुःख व्यक्त करणारा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 13 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaPriyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषणABP Majha Headlines : 03 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Parliament Session  : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh  यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Embed widget