Alia Ranbir Wedding : अरेच्चा! आलियानं लग्नासाठी कॉपी केला कंगनाचा दोन वर्षापूर्वीचा लूक? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
आलियानं कंगना रनौतनं (Kangana Ranaut) केलेला दोन वर्षापूर्वीचा लूक कॉपी केलाी आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
Alia Ranbir Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांनी काल (15 एप्रिल) लग्नगाठ बांधली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या वास्तू या घरामध्ये हा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या चाहते त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर शुभेच्छा दिल्या. पण सध्या सोशल मीडियावर आलियाच्या लग्नाच्या आउट-फिटची चर्चा होत आहे. आलियानं कंगना रनौतनं (Kangana Ranaut) केलेला दोन वर्षापूर्वीचा लूक कॉपी केलाी आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
आलियानं लग्नामध्ये डिझायनर सब्यसाचीनं डिझाइन केलेली साडी नेसली होती. पण या सारखी दिसणारी साडी नेसून कंगनानं 2020 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यावेळी कंगनानं सब्यसाचीला टॅग देखील केलं होतं. कंगनानं तिच्या भावाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी तो लूक केला होता. कंगनानं या साडी लूकला हिमाचली टच दिला होता. तिनं लाल रंगाची टोपी घातली होती. आता कंगनानं दोन वर्षा पूर्वी शेअर केलेल्या फोटोमधील तिचा लूक आणि आलियाचा लूक हा सारखाच आहे, असं नेटकऱ्यांचे मतं आहे. त्यामुळे सब्यासाची यांना अनेक प्रश्न सध्या नेटकरी विचारत आहेत.
View this post on Instagram
रिसेप्शन होणार का?
लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी पापाराझींचे आभार मानले आणि आलिया-रणबीरवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांना रिसेप्शनबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट केले. उलट त्या म्हणाल्या की, सगळं झालं आता तुम्ही आरामात घरी जाऊन झोपा.
View this post on Instagram
हेही वाचा :