Alia Bhatt : वयाच्या 9व्या वर्षी आलियानं दिलं ऑडिशन; 'या' चित्रपटात साकारलेली प्रिती झिंटाच्या बालपणीची भूमिका
Alia Bhatt : वयाच्या 9 व्या वर्षी आलियानं संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठी ऑडिशन दिले होते.
Alia Bhatt : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची (Alia Bhatt) प्रमुख भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच तिचा आरआरआर (RRR)हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची आलियाला इच्छा होती. वयाच्या 9 व्या वर्षी आलियानं संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठी ऑडिशन दिले होते. याबहद्दल एका मुलाखतीमध्ये आलिया भटनं सांगितलं आहे.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलियानं सांगितलं की, 'जेव्हा मी ब्लॅक चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेलो होते तेव्हा भन्साळींनी मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली नाही. ते म्हणाले की मला ते बालकलाकार म्हणून नाही तर भविष्यात मोठी अभिनेत्री म्हणून काम संधी देतील. ही गोष्ट खरी झाली आहे. '
View this post on Instagram
ब्लॅक चित्रपटात आलियानं काम केलं नाही पण 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या संघर्ष या चित्रपटात तिनं काम केलं. या चित्रपटात अक्षय कुमार आणि प्रिती झिंटा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. संघर्षमध्ये प्रिती झिंटाच्या बालपणीची भूमिका आलियानं साकारली. आलियाच्या हायवे, टू स्टेट्स, उडता पंजाब आणि गली बॉय या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
हेही वाचा :
- Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चे नवे पोस्टर प्रदर्शित, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
- Jersey Release Date : शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा 14 एप्रिलला होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha