एक्स्प्लोर

Akash Thosar Birthday : एका चित्रपटानं आयुष्य बदललं, आता थेट बॉलीवूडकरांच्या पंगतीत स्थान मिळालं, तरुणींचा क्रश असलेल्या आकाश ठोसरचा 'असा' आहे प्रवास

Akash Thosar Birthday : सैराट या चित्रपटात आकाशने परश्याची भूमिका साकारली होती. आज आकाशचा वाढदिवस आहे.

Akash Thosar Birthday : सैराट (Sairat) चित्रपटातून नावारुपाला आलेल्या परश्याचा म्हणजेच आकाश ठोसरचा (Akash Thosar) आज वाढदिवस आहे.  पहिल्याच चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आकाश हा प्रकाशझोतात आला. 100 कोटींचा गल्ला कमवणारा मराठीतील हा पहिला चित्रपट ठरलाच पण आकाशच्या आयुष्यासाठी तो चित्रपट फार महत्त्वाचा ठरला. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातून नव्या जोमाच्या पिढीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यांच्या पदार्पणात एक दर्जेदार चित्रपटाचा भाग त्यांना होता आलं. 

या चित्रपटात आकाशने परश्याची भूमिका साकारली होती. तसेच अभिनेत्री रिंकु राजगुरु ही आर्ची म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या जोडीने त्या वर्षात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. आज आकाशचा वाढदिवस आहे. आकाशचा जन्म हा पुण्यात झाला.  त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधून झाले. सैराट या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आकाश अनेक दर्जेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

सैराट चित्रपटासाठी अशी झाली आकाशची निवड

अभिनय क्षेत्रातील त्याच्या पदार्पणापूर्वी आकाश हा खेळात गर्क होता. तो कुस्ती खेळायचा. त्यावेळी तो कुस्तीसाठी  सोलापूरमधील  जेऊर गावात एका आखाड्यात सराव करायचा.सराव संपल्यानंतर तो काही वेळ रोज गावापासून दूर फिरायला जायचा. एके दिवशी आकाश रेल्वे स्टेशनवर बसला होता, त्यादरम्यान नागराज मंजुळे यांच्या भावाने आकाशचा फोटो काढला आणि तो नागराज यांना पाठवला. त्यावेळी नागराज मंजुळेंना आकाशचा चेहरा आवडला. त्यांनी आकाशला या चित्रपटासाठी विचारलं. आकाशनेही लगेचच या चित्रपटासाठी हो म्हटलं. पण या चित्रपटासाठी आकाशने देखील तितकीच मेहनत घेतली होती. त्याने या चित्रपटासाठी तब्बल 13 किलो वजन कमी केलं होतं. 

आकाशचा सिनेसृष्टीतला प्रवास

एका मराठी चित्रपटातून भेटीला आलेला हा तरुण आता अगदी बॉलीवूडकरांच्या देखील पंगतीत जाऊन बसला आहे. त्यानंतर आकाश ठोसर हा महेश मांजरेकर यांच्या फ्रेंडशीप अनलिमिटेड या चित्रपटात झळकला होता. पण हा चित्रपट फार काही चालला नाही. तसेच आकाशला रवी जाधव यांच्या आगामी बाल शिवाजी या चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणार आहे. आकाशने झुंड या चित्रपटातून बॉलीवूडमध्येही पदार्पण केलं. तसेच ओटीटीवर तो लस्ट स्टोरिजमध्ये अभिनेत्री राधिका आपटेसोबतही पहायला मिळाला.

परश्या - आर्चीच्या अफेअरच्या चर्चा

या चित्रपटातून आर्ची आणि परश्याची जोडी महाराष्ट्राच्या भेटीला आली. या चित्रपटातील आकाशची सहअभिनेत्री रिंकु राजगुरुची आजही तितकीच चांगली मैत्री आहे. पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लाडके आर्ची आणि परश्या हे फार चर्चेत आले होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare ) यांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शनला आकाश ठोसर (Akash Thosar) आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) यांनी देखील हजेरी लावली. 

ही बातमी वाचा :

VIDEO: रिसेप्शन आमिरच्या लेकीचं पण चर्चा मात्र आर्ची आणि परशाची; दोघांना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैराट प्रेमाची कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
सैराट प्रेमाची कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
Devendra Fadnavis on Uttam Jankar : पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Aaditya Thackeray In Kolhapur : शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार; कदमबांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचे पत्रकातून उत्तर
राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा, विचारांचा खरा वारसदार : शाहू महाराजांचे कदमबांडेंना उत्तर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Meet Shantigiri Maharaj:शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली  छगन भुजबळांची भेटSpecial Report Abhijit Patil : शरद पवारांना सोडून अभिजीत पाटील भाजपमध्ये जाणार ?TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 28 April 2024 : ABP MajhaSpecial Report Sanjay Raut Saswad : सुळेंच्या प्रचारासाठी राऊत मैदानात, सासवडमध्ये भाजपवर टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैराट प्रेमाची कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
सैराट प्रेमाची कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
Devendra Fadnavis on Uttam Jankar : पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Aaditya Thackeray In Kolhapur : शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार; कदमबांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचे पत्रकातून उत्तर
राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा, विचारांचा खरा वारसदार : शाहू महाराजांचे कदमबांडेंना उत्तर
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
CSK vs SRH : तुषार देशपांडेनं हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, धोकादायक ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम
मराठमोळ्या तुषार देशपांडेचा धमाका, हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम
Rohit Pawar on Ajit Pawar : आताचे दादा भाजपचे, पूर्वी राज्यात प्रचार, आता बारामतीच्या सोसायटीत जायची वेळ आली; रोहित पवारांचा सडकून प्रहार
दादा आमच्यासोबत मुख्यमंत्री झाले असते, आता बारामतीच्या सोसायटीत प्रचाराची वेळ आली; रोहित पवारांचा सडकून प्रहार
Chhagan Bhujbal : समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांचे महायुतीवर दबावतंत्र? पाच लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार
समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांचे महायुतीवर दबावतंत्र? पाच लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार
Embed widget