Ajith Kumar Accident : 180 चा स्पीड, बॅरियरला आदळली, 7 वेळा फिरली; अजित कुमारची कार चक्काचूर, रेसिंग कारचा भीषण अपघात
Ajith Kumar Accident : संपूर्ण भारताला 'वलिमै' सारखा ब्लॉकबस्टर देणारा तमिळ सुपरस्टार कार अपघातात सापडला. तो 180 किलोमीटर वेगानं कार चालवत होता.
Ajith Kumar Accident : तामिळ फिल्म इंडस्ट्रीचा (Tamil Film Industry) सुपरस्टार अजित कुमार (Ajit Kumar) यांचा रेसिंग कार चालवत असताना भीषण अपघात (Fatal Accident) झाला. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अजित कुमार कार रेसिंगचं प्रशिक्षण घेताना दिसत आहे. या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या वेगवान कारचा अपघात झाला. कारचं बोनेट उडून गेलं. तो दुबई 24H शर्यतीसाठी प्रशिक्षण घेत होता. जेव्हा त्याच्या कारला अपघात झाला, तेव्हा त्या कारचा वेग 180 किलोमीटर होता. अपघातानंतर व्यवस्थापक सुरेश चंद्र यांनीही अजितच्या तब्येतीचं अपडेट दिलं आहेत. अजितच्या गाडीला अपघात झाला असला तरी त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.
अजित कुमारच्या या कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, त्याची वेगवान कार ट्रॅकजवळ असलेल्या बॅरिकेट्सवर आदळली. त्यानंतर कार 7 वेळा जागेवरच गोल फिरली. यानंतर अभिनेत्याला तात्काळ ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आलं. पण, सुदैवानं मोटार रेसिंगमध्ये अजित यांना दुखापत झाली नाही. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांची चिंता वाढू लागली आणि लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते.
Ajith Kumar’s massive crash in practise, but he walks away unscathed.
— Ajithkumar Racing (@Akracingoffl) January 7, 2025
Another day in the office … that’s racing!#ajithkumarracing #ajithkumar pic.twitter.com/dH5rQb18z0
मॅनेजरकडून अजित कुमार हेल्थ अपडेट
अजित कुमार यांच्या फॅन्सची चिंता पाहून त्यांचे मॅनेजर सुरेश चंद्रा यांनी हेल्थ अपडेट जारी केलं. त्यांनी सांगितलं की, "अजित कुमार यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. ते सुखरूप आहेत. ज्यावेळी दुर्घटना झाली, त्यावेळी तो 180 किलोमीटरच्या वेगानं गाडी चालवत होता." दरम्यान, अजित कुमार यांन हऱ्याच काळापासून मोटर रेसिंगची आवड होती. 2000 च्या दशकात त्यांनी रेसिंगवर फोकस करण्यासाठी अॅक्टिंगमधून ब्रेक घेतला होता.
अजित कुमार यांची रेसिंग टीम
एका दशकाहून अधिक काळानंतर, अजित कुमार त्यांची नवी टीम 'अजित कुमार रेसिंग'सह ट्रॅकवर परतले आहेत. अजित हा रेसिंग टीमचा मालक आहे आणि तो त्याचे सहकारी मॅथ्यू डेट्री, फॅबियन डफीक्स आणि कॅमेरॉन मॅक्लिओड यांच्यासह रेसिंगमध्ये सहभागी होणार होता. फॅबियन ड्युफिक्स गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संघ व्यवस्थापक झाला होता.