Ajinkya Deo On Bollywood: 'मला अॅक्शन हिरो व्हायचं होतं, पण हिंदीतल्या लॉबीनं...'; मराठमोळ्या अजिंक्य देव यांच्याकडून बॉलिवूडच्या कंपूशाहीवर बोट
Ajinkya Deo On Bollywood: मला ॲक्शन हिरो बनायचं होतं, पण हिंदीतल्या लॉबीनं मला आत शिरू दिलं नाही, अशी तक्रार अजिंक्य देव यांनी केलेली.

Ajinkya Deo On Bollywood: मराठी सिनेसृष्टीतल अनेक अभिनेते (Actors), अभिनेत्रींनी (Actresses) हिंदीतही नशीब आजमावलंय. त्यातल्या फारच थोड्या जणांना यश आलंय. अनेकदा मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry) आणि हिंदी सिनेसृष्टीबाबत (Marathi Actors and Their Experience in Hindi Film Industry) एक चर्चा नेहमीच रंगल्याचं आपण पाहिलंय की, मराठी सेलिब्रिटींना हिंदीत अनेकदा नोकराच्या भूमिका मिळतात किंवा अगदी साईड रोल्स ऑफर होतात. अनेकदा मराठीत अगदी सुपरस्टार म्हणून ओळखले जातात, पण हिंदीत त्यांना फारसं यश मिळत नाही, असंही पाहायला मिळालंय. अशातच आता यावर नव्वदच्या दशकातला चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी भाष्य केलंय. अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी बोलताना मला ॲक्शन हिरो बनायचं होतं, पण हिंदीतल्या लॉबीनं मला आत शिरू दिलं नाही, अशी तक्रार केली आहे. एक स्टार किड असूनही अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असंही त्यांनी सांगितलंय.
मुलाखतीत बोलताना काय म्हणाले अजिंक्य देव?(Revelations and Experiences from the Interview)
'कॅचअप' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नव्वदीचा चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते अजिंक्य देव यांनी बॉलिवूडच्या कंपूशाहीवर बोट ठेवलंय. अभिनेते अजिंक्य देव म्हणाले की, "मला ॲक्शन हिरो व्हायचं होतं. त्यासाठी प्रयत्न करत मी हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्याचवेळी इंडस्ट्रीत अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगण (Actor Ajay Devgn) आले. मी त्यांच्यासोबत कामसुद्धा केलंय. अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबत मी 'पांडव'मध्ये काम केलं होतं. मराठीतला मोठा स्टार म्हणून ते माझ्याकडे बघायचे. पण मराठी अभिनेता म्हणून मला हिंदीतल्या लॉबीनं शिरू दिलं नाही... मी खूप प्रयत्न केले..."
"माझे वडील रमेश देव (Ramesh Deo) यांनी हिंदीतली लॉबी मोडून काढली होती. डॉ. श्रीराम लागू (Dr. Shriram Lagoo), नाना पाटेकर (Nana Patekar) यांनीसुद्धा ती लॉबी ब्रेक केली होती. पण माझ्यावेळी अनेक स्टारकिड्स इंडस्ट्रीत आले. अजय देवगण (Ajay Devgn), सनी देओल (Sunny Deol)... असे आम्ही सर्वजण एकाच काळातले आहोत... नंतर शाहरुख (Shah Rukh) चा काळ आला...", असं हिंदीतल्या लॉबीविषयी बोलताना अजिंक्य देव म्हणाले.
View this post on Instagram
हिंदीतली लॉबी मोडून काढणं मलाही कदाचित शक्य झालं असतं... पण... : अजिंक्य देव
याच विषयावर पुढे बोलताना अजिंक्य देव म्हणाले की, "कुठेतरी माझ्यातसुद्धा कमतरता असेल. मी डान्स नीट शिकायला हवा होता. हिंदीतली लॉबी मोडून काढणं मलाही कदाचित शक्य झालं असतं... पण मी एकाच कलेवर अवलंबून होतो. बाबांनी तेव्हाच निर्मिती संस्था सुरू केली होती. त्यामुळे मी त्यांच्यासोबत निर्मिती संस्थेचं काम पाहू लागलो होतो. कुठेतरी माझीही चूक असेल, माझंही दुर्लक्ष झालं असेल. पण माझ्याही वाट्याला चांगले चित्रपट आणि चांगल्या भूमिका आल्या आहेत...", असं ते म्हणाले.
आगामी प्रकल्प आणि पुनरागमन (Upcoming Projects and Comeback)
दरम्यान, अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाणारे अजिंक्य देव (Ajinkya Deo) आता लवकरच सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहेत. अजिंक्य देव (Ajinkya Deo) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) च्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनी मराठीत 'माहेरची साडी', 'सर्जा', 'कशासाठी प्रेमासाठी', 'माझं घर माझा संसार' यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, अलिकडेच आलेला आणि गाजलेला सिनेमा 'घरत गणपती'मध्येही अजिंक्य देव झळकलेले.
























